Manoj Jarange Speech Top 10 Points : मनोज जरांगे पाटलांच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे कोणते ?

Manjo Jarange Bhashan: "मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही ", जरांगे पाटलांचा इशारा
Manoj Jarange
Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

Jalna News: जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा पार पडली आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली होती. या सभेला लाखो लोकांची उपस्थिती होती. तब्बल 100 एकर शेतात ही सभा झाली. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला तातडीने आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली.

Manoj Jarange
Manoj Jarange Family : मनोज जरांगेंच्या पाठीशी आईचा आशीर्वाद, सभेला उपस्थित...

"मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय जरांगे पाटील एक इंचही मागे हटणार नाही", असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. तसेच 40 दिवसांपैकी सरकारकडे आता फक्त 10 दिवस उरलेत, त्यामुळे सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे पाटलांच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे कोणते ?

  • दर दहा वर्षाला ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा.

  • सर्व्हे करून प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात.

  • कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्या.

  • मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.

  • वेगळा प्रवर्ग करून टिकणारं आरक्षण आम्हाला द्या.

  • 'सारथी'साठी जास्तीचा निधी देऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावावा.

  • मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना निधी आणि सरकारी नोकरी द्या.

  • सार्थी संस्थेमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त निधी देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावा.

  • मराठा समाजासाठी स्थापन केलेली समिती आता बंद करा.

  • मराठा आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या.

  • मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही.

Manoj Jarange
Manoj jarange Rally : अवघा मराठा एकवटला अंतरवाली सराटीत; वाहनांच्या ४० किमीपर्यंत रांगा, शाळांना सुटी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com