Antarwali Sarati : अंतरवालीच्या ग्रामसभेत जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा विषयच नाही; गावातील विकास कामांवरूनच खडाजंगी!

Manoj Jarange latest News : अंतरवालीत होणाऱ्या ग्रामसभेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यापुढे गावात परवानगी नको, अशी भूमिका गावकरी घेणार असल्याची चर्चा होती.
antarvali sarati village
antarvali sarati villageSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत यापुढे आंदोलन नाही, झाले ते शेवटचे आणि निर्णायक होते, असे जाहीर करत येथील आंदोलनाचा मंडपही काढायला लावला. यावरून अंतरवाली सराटी आणि जरांगे पाटील यांच्या विरोधकांनी जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

अंतरवालीत होणाऱ्या ग्रामसभेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यापुढे गावात परवानगी नको, अशी भूमिका गावकरी घेणार असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत सोमवारी झालेल्या ग्रामसभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. ज्या अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) लढा दिल्लीपर्यंत पोहचला त्याच अंतरवालीतील काही ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करत त्यांनी समाजाची फसवणूक केल्याचे म्हटले.

जरांगे पाटील यांनी मात्र अंतरवाली सराटीतून झालेल्या कुठल्याही टीकेला उत्तर देणार नाही, या गावाने आंदोलनाला मोठी ताकद दिली, अशी भूमिका घेतली. सोमवारी नियोजित वेळेनुसार अंतरवाली सराटी येथे ग्रामसभा पार पडली. मात्र या ग्रामसभेत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा कुठलाच विषय नव्हता.

antarvali sarati village
Maratha Reservation: मराठा आंदोलकांनी पिटाळताच शिवसेनेचे दोन्ही आमदार अंतरवाली सराटीत दाखल; नांदेडच्या आंदोलनात नेमकं काय घडलं होतं?

केवळ गावातील विकास कामांवरच ग्रामस्थांनी चर्चा केली. ग्रामसभेच्या विषय पत्रिकेतही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा विषय समाविष्ट नव्हता. अंतरवाली सराटी ग्रामसभा कोरम अभावी २३ सप्टेंबर रोजी तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर 28 सप्टेंबरला पुन्हा ग्रामसभा बोलावण्यात आली होती.

antarvali sarati village
Navnath Waghmare : मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मॅनेज, मोठ्या डिलनंतर ते गुंडाळले; ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा गंभीर आरोप!

ग्रामपंचायत सचिव तथा मुख्याध्यापक पी. आर. पंडित यांनी या ग्रामसभेत मागील जमा-खर्चास मंजुरी, जन्म-मृत्यू-विवाह नोंदी, गावातील विकास कामांचा आढावा, 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' अभियान, शिक्षण विषयक बाबी आणि महाराष्ट्र महिला सक्षमीकरण अभियानावर चर्चा होणार असल्याचे विषय पत्रिकेत स्पष्ट केले होते.

antarvali sarati village
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील निर्णायक आंदोलनासाठी सज्ज; अंतरवालीत मंडप तयार, सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांच्या नजरा!

विशेषतः PMAY (प्रधानमंत्री आवास योजना) ग्रामीण २०२४ अंतर्गत कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करणे आणि प्रतीक्षा यादीत नाव नसलेल्या लाभार्थ्यांच्या नव्या अर्जांवर अंतिम निर्णय घेणे, हे दोन महत्त्वाचे विषय पत्रिकेवर होते. या सर्व विषयांवर निर्णय घेण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंचांनी केले होते. त्यानूसार काही मुद्यांवर ग्रामस्थांमध्ये खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com