Manoj Jarange Patil: मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली, घरीच उपचार सुरू; 29 ऑगस्टच्या उपोषणाबाबत महत्त्वाचा बदल

Maratha Reservation Protest: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा मराठवाडा दौरा आधीच रद्द करण्यात आला आहे. तसेच जरांगे पाटील यांच्यावर अंतरवाली सराटी येथे घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
Maratha reservation Manoj Jarange Patil
Maratha reservation Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : दोन दिवसापूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजाचा माझ्यावर दबाव आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर मराठवाडा आणि विदर्भातील समाज बांधवांचा आग्रह आहे की, 29 रोजीचे आंदोलन अंतरवालीत नकोच, मुंबईत करावे.

दबाव वाढला तर माझा नाइलाज होईल आणि मुंबईचा निर्णय होऊ शकतो, असे म्हटले होते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा मराठवाडा दौरा आधीच रद्द करण्यात आला आहे. तसेच जरांगे पाटील यांच्यावर अंतरवाली सराटी येथे घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (ता.19) येत्या 29 ऑगस्टचे आंदोलन अंतरवाली सराटी येथेच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, उपोषण सुरू असतानाच मुंबईला जाणार असल्याचे सांगत मुंबईतील आंदोलनासाठी पोलीसांकडे रितसर परवानगी मागितली असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

याचवेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आपल्यावर उपोषणाची वेळ आल्याचा आरोप केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरूनच बैठका घेण्यात आल्या. एकनाथ शिंदे आणि संजय सिरसाट यांची मिलीभगत आहे.

Maratha reservation Manoj Jarange Patil
Congress News : रावसाहेब दानवेंना पुन्हा घरी बसवण्यासाठी काँग्रेसचा 'प्लॅन' ठरला : जालना जिल्ह्याच्या नव्या कार्यकारिणीतून संकेत

मंत्री संजय शिरसाट यांनीच प्रमाणपत्र रद्द केले, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप आणि टीका केल्यानंतर जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com