Maratha Reservation : जरांगे-पाटलांची प्रकृती ढासळली; डॉक्टरही चिंतेत

Manoj Jarange Patil : जरांगे-पाटलांच्या नाकातून रक्तस्राव, उपचार करून घेण्यास नकार
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Antarwali Sarati Jalna News :

मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे-पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला असून त्यांना बोलताही येत नाही. त्यांची प्रकृती ढासळळ्याने डॉक्टरही चिंतेत आहेत. गंभीर बाब म्हणजे त्यांना उपचार करून घेण्यास ठाम नकार दिला आहे.

मराठा आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे-पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणास्र काढले आहे. त्यामुळे सरकारचीही चिंता वाढली आहे. (Indefinite Hunger Strike)

Manoj Jarange Patil
OBC Vs Maratha : 'ओबीसीं'कडून 'सगेसोयरे'वर तब्बल 60 हजारांवर हरकती...

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकारने सगेसोयरे या शब्दासाठी अधिसूचना काढली आहे. मात्र, या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार जरांगे-पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, उपोषणाचा जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचा आजचा पाचवा दिवस आहे. चार दिवसांच्या उपोषणाने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी अन्नपाणी-औषध व्यर्ज केले आहे. अशातच त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरही चिंतीत आहेत.

जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. जरांगे-पाटील यांनी आता कुठलीही तडजोड नाही, आधी मागण्या पूर्ण करा अन् मगच माझ्याकडे या, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्र्यांकडून मराठ्यांची फसवणूक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोपही जरांगे-पाटील यांनी केला आहे. 15 फेब्रुवारीला होणारे अधिवेशन 20 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्याने जरांगे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिसूचनेची अंमलबजावणी केल्याशिवाय पाणीही न पिण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

(Edited by Avinash Chandane)

Manoj Jarange Patil
Ashok Chavan in Bjp : काँग्रेसमध्ये पुन्हा मोठा भूकंप? अशोक चव्हाणांनंतर 'हे' दोन आमदार भाजपच्या वाटेवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com