OBC Vs Maratha : 'ओबीसीं'कडून 'सगेसोयरे'वर तब्बल 60 हजारांवर हरकती...

Department of Social Justice and Special Assistance : नगरमधील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे जमा करण्यात येणार.
OBC Vs Maratha
OBC Vs MarathaSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : राज्य सरकारच्या सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू असून, त्यांची प्रकृती खालवली आहे. आज त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याचे पडसाद देखील महाराष्ट्रातील मराठवाड्यात उमटू लागले आहेत. मात्र नगरमधील 'ओबीसीं'कडून 'सगेसोयरे'वर तब्बल 60 हजारांवर हरकती दाखल केल्या जाणार आहे.

नगरमध्ये ओबीसींच्या हरकतींचे संकलन करण्यात आले आहे. तब्बल 60 हजारांवर हरकतींचे संकलन झाले असून, त्यांचे वर्गीकरण करण्यात येत आहे. यासाठी ओबीसी समाजाचे बाळासाहेब भुजबळ, निलेश चिपाडे, राजेंद्र पडोळे, रामदास फुले, मनोज भुजबळ, संदीप भांबरकर आदी यासाठी कार्यरत आहेत.

राज्य सरकारने 26 जानेवारीला मराठा आरक्षणासाठी 'सगेसोयरे'च्या संदर्भात अधिसूचना काढली होती. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी चलो मुंबईची हाक दिली होती. या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना सगेसोयरे संदर्भात अधिसूचना दिली. यावर आता हरकती नोंदवण्याचे काम संपूर्ण राज्यभरातून सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

OBC Vs Maratha
Ashok Chavan : चव्हाणांची भाजपला 'साथ', आता नांदेडच्या माजी नगरसेवकांनीही घेतला मोठा निर्णय

ओबीसींतून मराठा समाजाला आरक्षणाला सकल ओबीसी समाजाचा विरोध आहे. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचे नेते आणि समाज एकटवला आहे. आता नगरमधून सगेसोयरे अधिसूचनेविरोधात तब्बल 60 हजारांवर हरकती दाखल करण्याची तयारी ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे.

सरकारच्या अधिसूचनेवर ओबीसी प्रवर्गातून मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल केल्या जाणार आहेत. नगर जिल्ह्यातील तालुक्यांसह बीड, पुणे, सांगली, सातारा, जळगाव, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोले, मनमाड, नागपूर या जिल्ह्यांतून हरकतींचे पत्र नगरमध्ये दाखल केले जाणार आहे. या सर्व हरकतींचे पत्र एकत्र करून मुंबईतील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जमा करण्यात येणार आहेत. या हरकतींचे वर्गीकरण सुरू करण्यात आले आहे.

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. अंतरवली सराटी (ता. जालना) येथे हे आंदोलन सुरू असून, गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू असल्याने त्यांची प्रकृती खालवली आहे. यातच आज त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदचे पडसाद मराठवाड्यात उमटू लागले आहे. मनमाड, बीड, जालना जिल्ह्यातून प्रतिसाद मिळू लागले आहे.

व्यापारी बंदमध्ये सहभागी नाहीत...

राहुरी शहरातील सर्व व्यावसायिकांनी आजपर्यंत मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. सध्या बाजारपेठमध्ये प्रचंड प्रमाणात मंदी असल्याने राहुरी शहर बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे मराठा समाजाने पत्रकाद्वारे सांगितले आहे. मात्र मराठा आरक्षणासाठी राहुरी तहसील कार्यालयावर सर्व मराठा संघटना एकत्र येत आज सकाळी आंदोलन करणार आहेत.

(Edited by Amol Sutar)

OBC Vs Maratha
Shivsena News : "...अन् हीच भाजपच्या पराभवाची गॅरंटी", चव्हाणांच्या प्रवेशावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com