Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील कुणबी, मोठा पुरावा हाती...

Maratha Reservation : कुणबी नोंदीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे याची कुणबी नोंद असलेली कागदपत्रे सापडली का? म्हणून विचारणा देखील केली जात होती.
Manoj Jarange land record documents
Manoj Jarange land record documents sarkarnama
Published on
Updated on

BEED : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देण्याच्या मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. सरकारने समिती नेमूण कुणबी नोंद घेण्यास सुरुवात केली होती. कुणबी नोंदीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे याची कुणबी नोंद असलेली कागदपत्रे सापडली का? म्हणून विचारणा देखील केली जात होती. पाच दिवसांपुर्वी आपली कुणबी नोंद सापडली नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता त्यांना दिलासा मिळाला आहे.

सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देण्याच्या मागणीचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटील यांचीही कुणबी नोंद आढळली आहे. रविवारी भूमि अभिलेखच्या दस्तऐवजात मोडी लिपीतील त्यांच्या पुर्वजांची नोंद आढळली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर सरकारने नोंदी शोधण्यासाठी वेळ मागून घेतला. यासाठी न्यायमुर्ती (निवृत्त) संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली.

Manoj Jarange land record documents
Beed Political : जनतेच्या विकासकामात खोडा घालू नका..! क्षीरसागरांनी मंत्री मुंडेंना सुनावले...

मराठवाड्यात सर्वाधिक नोंदी बीड जिल्ह्यात आढळल्या. १३ हजारांहून अधिक नोंदी आढळल्याचा अहवाल प्रशासनाने दिला. मात्र, समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मागणीच्या आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांचीच नोंद आढळली नव्हती. मनोज जरांगे पाटील मुळचे जिल्ह्यातील मातोरी (शिरुर कासार) येथील रहिवाशी आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी कागपत्रे गहाळ आहेत, मोडी लिपी किंवा उर्दूतील नोंदींचा शोध घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही, काही ठिकाणी अधिकारी जाणिपूर्वक नोंदी दडवत असल्याचे आरोप करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र,या सर्व तक्रारीनंतर रविवारी समिती शिरुर कासार तालुक्यात दाखल झाली. येथील भुमी अभिलेख कार्यालयात सकाळ पासून कागद पत्रांची पाहणी करून दुपारनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मुळ गाव आसलेले मातोरी गावात त्यांची नोंद आसल्याचे निदर्शनास आले आहे. भुमिअभिलेख कार्यालयात उपाधीक्षक भूमी अभिलेख अल्पेश पाटील व मोडी आभ्यसक संतोष यादव यांनी याचा शोध घेतला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे वडील रावसाहेब जरांगे पाटील देखील उपस्थित होते.

1880 च्या ब्रिटीश सरकारच्या काळातील अतिजिर्ण झालेल्या दस्ताऐवज नोंदीतून या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तालुक्यात 54 गावांची तपासणी करण्यात आली. त्यामधे 34 गावांत151 नोंदी 33-34 नमुन्यात आढळून आल्या. तर, 2620 नोंदी पैकी 2469 इतर नोंदी सापडल्या. याच तालुक्यातील बावी, भडकेल, बोरगाव च. हाजीपुर, फुल सांगवी, तिंतरवणी, तरडगव्हण भोसले, घाटशिळपारगाव व जाटनांदूर या गावात 151 कुणबी नोंदी मिळाल्या आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com