Beed Political : जनतेच्या विकासकामात खोडा घालू नका..! क्षीरसागरांनी मंत्री मुंडेंना सुनावले...

Beed District Planning Committee meeting : बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठक ; राजकारण राजकारणाच्या मैदानात करण्याचा आमदारांचा पालकमंत्र्यांना सल्ला...
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Political : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आमची निष्ठा मोठ्या साहेबांशीच, असे क्षीरसागर यांनी ठणकावून सांगितले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, यातून संघर्षही झाला.

जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि संदीप क्षीरसागर यांनी कधीकाळी एकत्र एकाच पक्षात काम केले. पण या दोघांचे सूर कधी जुळलेच नाही. आता राष्ट्रवादीत दोन गट झाल्यानंतर बीड (Beed) जिल्ह्यात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्याचे शिवधनुष्य संदीप क्षीरसागर यांच्या खांद्यावर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदीप क्षीरसागर आक्रमक झाले आहेत.

Dhananjay Munde
Eknath shinde Vs uddhav thackeray : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे आमने सामने!

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी पालकमंत्री मुंडे यांचे नाव न घेता राजकारण राजकारणाच्या मैदानात करा, जनतेच्या विकासकामात खोडा घालू नका, अशा शब्दात सुनावले. आज बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

बीड विधानसभा मतदारसंघावर केला जाणारा अन्याय सहन करणार नाही, अशी भूमिका घेत, क्षीरसागर यांनी मतदारसंघातील विकासकामासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. राजकारण राजकारणाच्या मैदानात व्हावे, जनतेच्या कामांमध्ये खोडा निर्माण करून आपल्या विरोधकांना अडचणीत आणण्याची भूमिका लोकशाही विरोधी असल्याचे त्यांनी सांगितले.

बीड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना कशाला त्रास देता, घोडामैदान या वर्षातच आहे त्या ठिकाणी मैदानात लढा ना, जनता या अवमनाला योग्य उत्तर देईल, असा इशाराही क्षीरसागर यांनी बैठकीत दिला. बैठकीमध्ये मतदार संघातील विकासकामांच्या बाबतीत व इतर महत्त्वाच्या विषयांवरही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सदरील विषय आजच्या इतिवृत्तामध्ये समाविष्ट करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. संपुर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे घोषीत होऊनही शासन स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. बीड शहरातील पाणी प्रश्न गंभीर होत असून यावर उपाययोजना करावी लागेल.

येत्या पंधरा दिवसात टॅंकर सुरू करावे लागतील, याकडेही क्षीरसागर यांनी पालकमंत्री मुंडे यांचे लक्ष वेधले. बीड नगरपरिषदेकडे महावितरणचे 36 कोटी थकबाकी आहे. ती थकबाकी भरण्यासाठी व दुष्काळ निवारण व कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने 16 ऑक्टोबर 2023 रोजी नगरपरिषदेकडे दिलेला निधी महावितरणकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली.

याशिवाय पीक विमा, नुकसानीचे पंचनामे,शेतकरी कर्जाचे पुर्नगठण, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुसंवर्धन, नगरपरिषद, शिक्षण विभाग, महावितरणशी संबंधित विविध विषयांवर क्षीरसागर यांनी बैठकीत आक्रमकपणे भूमिका मांडली.

(Edited by Amol Sutar)

Dhananjay Munde
India Maldives : भारतावरील टीका भोवली; मालदीवच्या महिला मंत्र्यासह तिघांवर निलंबनाची कारवाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com