Maratha Reservation: मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांचा मराठवाडा दौरा तडकाफडकी रद्द, 29 ऑगस्टच्या आंदोलनाचं ठिकाणही बदललं

Manoj Jarange Patil Marathwada Tour: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. तीन दिवसांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा यशस्वी करून आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : हैदराबाद गॅझेटनूसार आढळलेल्या नोंदीच्या आधारे मराठा कुणबी जातीची दिली जाणारी प्रमाणपत्र जात वैधता समितीकडून रद्द केली जात आहेत. दोन मराठवाड्यातील दोन जिल्हा परिषद सदस्य, एक नगरपालिकेतील नगरसेवकाचे मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरवल्यानंतर हा वाद आता चांगलाच चिघळला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. तीन दिवसांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा यशस्वी करून आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. दोन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर काल त्यांनी अंतरवालीमध्ये मराठा समन्वयक, अभ्यासकांशी चर्चा केली.

दरम्यान, ते मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार होते. परंतु डाॅक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे, तसेच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी त्यांची प्रकृती अद्यापही पूर्णपणे बरी नाही. त्यामुळे नियोजित मराठवाडा दौरा रद्द करण्यात आला आहे. विदर्भाच्या दौऱ्यासंदर्भात अद्याप काही निर्णय झालेला नाही.

अंतरवाली नव्हे, मुंबईच.. मनोज जरांगे पाटील हे 29 रोजी अंतरवाली येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करणार होते. परंतु पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पूर्ण करून आल्यानंतर मराठवाडा आणि विदर्भातील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आंदोलन अंतरवालीत नको, मुंबईतच हवे, असा आग्रह धरला आहे.

Manoj Jarange Patil
Narendra Dabholkar Murder Case : मोठी बातमी! नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयला दणका, प्रमुख आरोपीला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेबाबतही मोठा निर्णय

समाज बांधवांशी आपण चर्चा करणार आहोत, ते मुंबईतील आंदोलनावर ठाम राहिले तर मग माझाही नाईलाज असले. अंतरवालीऐवजी मुंबईतील आंदोलनाचा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता स्वत: मनोज जरांगे पाटील यांनीही बोलून दाखवली आहे. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 29 आॅगस्ट रोजी आंदोलन करण्याची परवानगी मिळावी, असा लेखी अर्ज देखील मुंबई पोलीस आयुक्तांकडे केला आहे.

मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा रद्द झाल्यामुळे दौऱ्यासाठी जी ताकद, मेहनत आणि तयारी आपण करत होतो, तीच ताकद आता 29 तारखेच्या उपोषणाच्या तयारीसाठी लावा, गावागावात जा, समाजबांधवांशी संवाद साधा, 29 तारखेच्या उपोषणासाठी प्रत्येक गाव सज्ज करा. दौरा रद्द झाला, पण संघर्ष थांबलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या सोशल मीडिया पेजवरून 29 तारखेसाठी गावागावांतून तयारीला लागा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com