Narendra Dabholkar Murder Case : मोठी बातमी! नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयला दणका, प्रमुख आरोपीला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेबाबतही मोठा निर्णय

Narendra Dabholkar and Sachin Andure : महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दणका दिला आहे. न्यायालयाने प्रमुख आरोपी सचिन अंदुरे याला जामीन मंजूर केला असून, त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेवरही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Narendra Dabholkar
Narendra Dabholkarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक वळण आले आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. १८) जामीन मंजूर केला आहे. तसेच अंदुरे याला न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा आदेश न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने दिला असून, उच्च न्यायालयाने सीबीआयला दणका दिल्याचे आता बोलले जात आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर परिसरातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. डॉ. दाभोलकर हे मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

यानंतर सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करत होते. पण २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास CBI कडे वर्ग करण्यात आला. तर CBIने केलेल्या तपासादरम्यान अनेक आरोपींची नावे समोर आली होती. ज्यानंतर पुण्यातील विशेष न्यायालयाने प्रमुख आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते.

Narendra Dabholkar
Narendra Dabholkar murder case : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण; शरद कळसकरचे शिक्षेला आव्हान, पुरावेच नसल्याचा दावा

तर या प्रकरणात दोघांना जन्मठेपेच्या शिक्षेसह प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला होता. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

यानंतर आता न्यायालयाने डॉ. दाभोलकरांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला जामीन मंजूर केला आहे. तसेच अंदुरे याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायालयाला अंदुरे याच्याविरोधात दोष सिद्ध करण्याइतका पुरावा मिळाला नसल्याने जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी शरद कळसकर याला उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे.

Narendra Dabholkar
Narendra Dabholkar Case : नरेंद्र दाभोलकर हत्या ते निकाल, 11 वर्षांत काय घडलं? वाचा सविस्तर...

या निर्णयानंतर आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सचिन अंदुरेच्या जामिनाला विरोध करत, ‘अंदुरेला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल,’ असे म्हटले आहे. तसेच आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कुटुंबीय या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जातात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com