"जेव्हा भाजपचं सरकार येते, तेव्हा मराठा आरक्षण मिळते. आणि शरद पवारांचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण का जाते?" असे म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी निशाणा साधला होता.
यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी अमित शाह ( Amit Shah ) यांना लक्ष्य केलं आहे. "कधीपर्यंत अमित शाह तेच-तेच पाढे गिरवणार आहेत?" असा सवाल उपस्थित करत जरांगे-पाटलांनी सुनावलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणाले, "भाजपचे ( bjp ) सरकार तीन वर्षांपासून आहे. भाजप सरकारनं का आरक्षण दिलं नाही. वरून महिलांवरती गोळ्या झाडल्या, गुन्हे दाखल केले. महाविकास आघाडीनं मराठा आरक्षण घालवलं, हे आम्हाला माहिती आहे. मात्र, अमित शाह तेच पाढे कधीपर्यंत गिरवणार आहेत? दहा वर्षे झालं फक्त आरक्षण देतो, देतो, हेच सांगितलं जात आहे."
'मराठ्यांना ( Maratha Reservation ) ओबीसीतून आरक्षण द्यायला शरद पवार-उद्धव ठाकरे तयार आहेत का?' असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. यावर जरांगे-पाटलांनी म्हटलं, "शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचं मत ओबीसीतून आरक्षण द्यावं, असं नाही. पण, तुमचं ( फडणवीस ) काय मत आहे. तुम्हाला ( फडणवीस ) आरक्षण द्यायचं आहे की नाही? कधीपर्यंत एकमेकांवर मराठा आरक्षणाचा विषय टोलवणार आहात? ओबीसी कोट्यातून देणार आहात की नाही? याबाबत तुमचं ( फडणवीस ) मत सांगा."
"तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार असल्याची घोषणा करून टाकावी. मराठे तुम्हाला पाठिंबा देतील. कधीपर्यंत महाविकास आघाडी आणि महायुती मराठ्यांचा वापर करणार आहे?" असा रोखठोक सवाल जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.