Manoj Jarange Patil : सुनेत्राताईंनी अजितदादांसारखं खंबीर व्हावं, परिवाराची साथही सोडू नये! मनोज जरांगे पाटील शपथविधीवर बोलले..

Sunetra Pawar Deputy CM सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी खंबीर नेतृत्वाचा सल्ला देत कुटुंबाची साथ सोडू नये आणि राजकीय डावपेचांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
Maratha reservation leader Manoj Jarange Patil addressing the media while reacting to Sunetra Pawar taking oath as Maharashtra’s Deputy Chief Minister.
Maratha reservation leader Manoj Jarange Patil addressing the media while reacting to Sunetra Pawar taking oath as Maharashtra’s Deputy Chief Minister.Sarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar Oath News : राजकीय डावपेचाचा भाग म्हणा, की काही कायदेशीर अडचणी म्हणून आज सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असले. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी एक महिला विराजमान झाली ही चांगलीच गोष्ट आहे. सुनेत्राताई यांनी अजितदादांसारख खंबीर होऊन नेतृत्व करावं आणि त्या करतील. हे करत असताना राजकारणात आता जी गिधाडं त्यांच्याभोवती जमा झाली आहे, त्यांच्यापासूनही सावध राहावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिला.

संकटाच्या काळात कुटुंबाची साथ महत्वाची असते, सुनेत्राताईंनी परिवाराची साथही सोडू नये, असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून एवढी घाई कशासाठी? पवार कुटुंबात वाद आहेत का? शरद पवारांनी शपथविधीला आमच्या कुटुंबातील कोणी जाणार नाही? हे सांगणे यावरून बरीच चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी हा निर्णय योग्यच असल्याची प्रतिक्रिया दिली. सुनेत्रा पवार या मराठवाड्याची लेक आणि पवार घराण्याची सून आहेत. त्यांना माहेरी आणि सासरी दोन्हीकडे राजकीय वारसा लाभलेला आहे. अजित पवारांनी ज्या खंबीरपणे राज्याचे नेतृत्व केले, त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार यांनीही काम करावं. अचानक जमा झालेल्या गिधाडांपासून सावध राहावं, असा सल्लाही जरांगे यांनी दिला आहे.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेतत हा चांगला विषय आहे. राजकिय डावपेच मी सांगू शकत नाही. अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता. हा त्यांचा डावपेच असू शकतो मी सांगू शकत नाही. सर्वांना घेऊन चालावं. जे गिधाड नव्हते ते आता घिरट्या घालायला लागले आहेत. त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल. दादा हे दादा होते.

Maratha reservation leader Manoj Jarange Patil addressing the media while reacting to Sunetra Pawar taking oath as Maharashtra’s Deputy Chief Minister.
Sanjay Shirsat : खुर्ची जिंकली माणूस हरला! सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर संजय शिरसाटांची जाहीर नाराजी

दादांसोबत न दिसणारे गिधाड आता दिसू लागले आहेत. सुनेत्रा पवार यांनी अचानक जमलेल्या ढेकणांवर लक्ष ठेवावे. हे ढेकण आणि गिधाडं घात करू शकतात, सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबाला सोबत घ्यावं, हे ढेकणं खूप रक्त पिऊ शकतात, त्यावेळी कुटुंबच तुमच्या कामाला येईल. काही अडचणीमुळे सुनेत्रा पवार यांनी तातडीनं उपमुख्यमंत्री पद स्वीकारले असावे. पार्थ आणि जय पवार यांना दादांनी काही सल्ला दिलेला असेल त्याचे पालन त्यानी करावे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

Maratha reservation leader Manoj Jarange Patil addressing the media while reacting to Sunetra Pawar taking oath as Maharashtra’s Deputy Chief Minister.
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची लगबग... पण शिवसेना आमदारांच्या मनात वेगळचं काहीतरी; भाजप-राष्ट्रवादीवर जाहीर नाराजी

धनंजय मुंडे मंत्री होणार नाही..

बीडच्या पालकमंत्री पदी पुन्हा धनंजय मुंडे येणार अशी चर्चा सुरू आहे, याकडे जरांगे पाटील यांचे लक्ष वेधले असता तशी कुठलीही शक्यता नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. तो कुठेही बोबलंत फिरत असतो, मध्ये दिल्लीलाही जाऊन आला, त्यानंतर अशाच चर्चा सुरू झाल्या होत्या. पण त्याला मंत्रीमंडळात परत घेण्याची कुठलीच शक्यता नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com