Antarwali Sarati : मनोज जरांगेंनी आपल्या भाषणात सरकारवर टीकास्त्र डागले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी गंभीर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समज द्यावी, असे सांगत आरक्षणाची पुढील दिशा २२ ऑक्टोबरला ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जरांगे पाटील म्हणाले, "आम्हाला महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल, पण एनटी व्हीजेएनटीचा प्रवर्ग टिकला तसेच आरक्षण घेणार. एकूणात 50 टक्क्यांच्यावर आम्हाला आरक्षण नकोच,"
केंद्र सरकार अन् राज्य सरकारने मराठ्यांचे हाल करू नयेत. आमचा ओबीसीत समावेश करा. दहा दिवसांपेक्षा अधिक काळ वाट पाहण्याची आमची तयारी नाही," असा सज्जड दम जरांगेंनी सरकारला दिला. "22 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आणि त्यानंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील," असे ठामपणे जरांगेंनी सांगितले.
काय म्हणाले जरांगे पाटील...
कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या.
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी, सरकारी नोकरी द्यावी.
दर दहा वर्षांनी आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा आणि प्रगत जाती बाहेर काढाव्यात.
PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथीकडून जास्तीचा निधी देऊन त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावा.
सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा .
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.