Manoj Jarange Patil Live
Manoj Jarange Patil LiveSarkarnama

Manoj Jarange Patil : वेगळा प्रवर्ग करून टिकणारं आरक्षण द्या! ; आरक्षणाशिवाय हटणार नाही, जरांगेंचा निर्धार

Maratha Reservation : मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
Published on

Antarwali Sarati : "वेगळा प्रवर्ग करून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिले तरी चालेल, पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण द्या, आरक्षण पदरात घेतल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत सरकारला दिला.

"कोण म्हणतं मराठा एक होत नाही, हे या गर्दीने दाखवून दिले,' असे सांगत जरांगेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, कोपर्डीतील तरुणीवर बलात्कार करणाऱ्याला फाशी द्यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

भाषणापूर्वी मनोज जरांगेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या सभेसाठी त्यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या. या सभेसाठी राज्यभरातून मराठा आंदोलक आले आहेत.

Manoj Jarange Patil Live
Manoj Jarange Rally : जरांगेंना अटक करा; गृहविभागाला सदावर्तेंचे पत्र, पोलिस अलर्ट...

जरांगे म्हणाले," दर दहा वर्षाला ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचा सर्व्हे सरकारने केला पाहिजे . 'सारथी'संस्थेसाठी जास्तीचा निधी देऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावावा. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त निधी देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावा,"

"मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटी येथे होणारी सभा हिंसक होईल, सभेला परवानगी देऊ नका, जरागेंना तातडीने अटक करा," अशा मागणीचे पत्र गुणरत्ने सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांना व गृहसचिवांना दिले आहे.

सदावर्तेंच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, " सभा हिंसक होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते यांना समज द्यावी, असे जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. "गुणरत्न सदावर्ते हे कुणाचं पिल्लू आहे, हे सगळ्यांना माहित आहे, चेल्यांना मी उत्तर देत नसतो," अशा शब्दात जरांगेंनी सदावर्तेंना फटकारलं आहे.

Manoj Jarange Patil Live
Manoj Jarange News : सभेपूर्वी जरांगे म्हणाले, ""मराठ्यांची वेदना सांगण्यासाठी आजची सभा; अंतरवाली सराटीत एल्गार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com