A Y Patil Meet Sharad Pawar : ए. वाय. पाटील बॅक टू पॅव्हेलियन, शरद पवारांशी पुन्हा जुळलं?

A Y Patil Support Congress : अजित पवार यांच्या गटाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले ए. वाय. पाटील यांनी महायुतीच्या विरोधात जात काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.
A Y Patil Meet Sharad Pawar
A Y Patil Meet Sharad PawarSarkarnama

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha Election 2024) अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. खास करून राधानगरी तालुका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघात आगामी राजकीय गणित डोळ्यांसमोर ठेवून अनेकांनी राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची अधिक चर्चा रंगत असताना दिसत आहे.

राष्ट्रवादी अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या गटाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले ए. वाय. पाटील (A Y Patil) यांनी महायुतीच्या विरोधात जात काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यासह अजित पवार यांना धक्का देत त्यांनी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावून आगामी राजकीय भवितव्याचे संकेत दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दहा महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिला. त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यात उमटले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), ए. वाय. पाटील यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

माजी आमदार के. पी. पाटील (K P Patil) यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत अजित पवारांना पाठिंबा दिला. पण, याच कारखान्याच्या निवडणुकीत के. पी. पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याविरोधात जात ए. वाय. पाटील यांनी आबिटकर गटाला साथ दिली.

नंतर राधानगरी तालुक्यात ए. वाय. पाटील यांनी दोन हात लांब राहत हसन मुश्रीफांवर फटकारे ओढत लोकसभेला महायुतीच्या विरोधात जात काँग्रेसला पाठिंबा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीचं राजकीय चित्र डोळ्यासमोर ठेवत आमदार प्रकाश आबिटकर यांची शिवसेना आणि माजी आमदार के. पी. पाटील यांची अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी निश्चित समजली जात असताना आपली अडचण होऊ नये, यासाठी ए. वाय. पाटील पाऊल उचलताना दिसत आहेत.

A Y Patil Meet Sharad Pawar
Sharad Pawar News : भाजपशी संधान बांधलेल्या अभिजित पाटलांवर पहिल्यांदाच बोलले शरद पवार; राज्यकर्त्यांना फटकारलं

यातच राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला हजेरी लावत ए. वाय. पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावरून मनोमिलन झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे ए. वाय. पाटील बॅक टू पॅव्हेलियन करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

A Y Patil Meet Sharad Pawar
Sharad Pawar News : नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला; पवारांचा जोरदार टोला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com