
Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी सरकारला खूप वेळ दिला, अजूनही तीन महिने मी काहीच बोलणार नाही. त्याआधी मी आणखी एक प्रयोग करणार आहे. राज्यातील सर्व पक्षांचे 288 आमदार, मंत्री, खासदार, विधान परिषद, राज्यसभेचे सदस्य, आजी-माजी अशा सगळ्यांनाच आपण फोन करणार आहोत. अंतरवालीकरांच्या वतीने त्यांना चर्चेसाठी बोलावणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगीतले.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी 29 आॅगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहोत. शांत मार्गाने आम्ही आमच्या मागणीसाठी आंदोलन करु, गेल्यावेळी वाशीवरून माघारी फिरलो होतो, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मघार घेणार नाही, अशा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. अंतरवाली सराटी येथे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईत केल्या जाणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली.
येत्या अधिवेशनात आमचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा, गुलाल घेऊन येतो. मी 29 ऑगस्टपर्यंत काहीही बोलणार नाही. मी मुंबईला आलो तर परत जाणार नाही. (Manoj Jarange Patil) मी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना 14 जून रोजीपासून फोन करणार आहे. आम्ही प्रत्येक आमदाराला अंतरवाली सराटीमध्ये बोलवणार आहोत. विधानपरिषदेच्या आमदारांनाही आम्ही बोलवणार आहोत. यात आजी-माजी आमदार, खासदारही असतील.
मराठा आणि कुणबी एक आहे, त्याच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक असल्याचा कायदा पारीत करावा. सगेसोयरे मुद्द्याची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या आम्ही त्यांना करणार आहोत. मी 29 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना एकही शब्द बोलणार नाही. आजपासून तीन महिने मी कोणालाही काहीही बोलणार नाही. येत्या 30 जूनच्या अधिवेशनात आमचा विषय मार्गी लावा. आम्हाला मुंबईत यायची वेळ येऊ देऊ नका.
आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मी यावेळी मुंबई सोडणार नाही. माझ्या समाजाने वाशी येथून परत जाऊन तुम्हाला वेळ दिला होता. आता मात्र आम्ही वापस जाणार नाही, आमची अडवणूक करू नका, आमची फसवणूक करू नका, आमची मुलं फाशी घेत आहेत, असेही जरांगे पाटील म्हणाले. 29 ऑगस्टनंतर मी कोणलाही जवळ येऊ देणार नाही.
यावेळी दहापट मराठा मुंबईत जातील. सर्व सात कोटी मराठा हे मुंबईत असतील. बळाचा वापर केला, आमच्या पोरांच्या अंगाला हात लावला तर मात्र रेल्वे, रस्ते आणि विमानतळंही रोखू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. सध्या महाविद्यालयांचे प्रवेश सुरू आहेत, मात्र व्हॅलिडीटी आणि जात प्रमाणपत्र दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यावर तातडीने निर्णय घेऊन ते द्यावे, अशी मागणी जरांगे यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.