Mumbai Maratha Morcha Planning : मनोज जरांगे 'OBC'मधून आरक्षणावर ठाम; मुंबईतील मोर्चाच्या नियोजनाची जंगी तयारी

Manoj Jarange to Hold Planning Meeting in Jalna for Upcoming Maratha Reservation Morcha in Mumbai: मुंबईत 29 ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार असून, त्याच्यानिजोयनासाठी अंतरवाली सराटी इथं मराठा समाजबांधवांची राज्यस्तरीय बैठक होणार आहे.
Mumbai Maratha morcha planning
Mumbai Maratha morcha planningSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Meeting: मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबतची नव्याने सुनावणी आजपासून मुंबई उच्च न्यायालयात सुरू होत असतानाच, इकडं अंतरवाली सराटी इथं मुंबई काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी नियोजन बैठक आयोजित केली आहे.

मुंबईत 29 ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी, निजोयनासाठी अंतरवाली सराटी येथे 29 जूनला मराठा समाजबांधवांची राज्यस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी स्वतः दिली.

मनोज जरांगे म्हणाले, "सरकारचे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. सरकारने दिलेल्या 10 टक्के आरक्षणाला आमचा विरोध आहे. राज्यात व केंद्रात टिकणारे 'ओबीसीं'मधून (OBC) आरक्षण हवे. सरकारला दीड वर्ष वेळ दिला. आता वेळ देणार नाही. आता 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढणारा आहे".

या मोर्चालाही 'न भूतो न भविष्यति' एवढी मोठी गर्दी असेल. ही मराठ्यांची लाट सरकारला रोखता येणा नाही. मोर्चाच्या नियोजनासाठी 29 जूनला अंतरवाली सराटीत राज्यस्तरीय बैठक घेणार आहे. आजपर्यंत दिलेल्या लढ्यात काय मिळाले, काय राहिले याची माहिती बैठकीत देण्यात येईल, असे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सांगितले.

Mumbai Maratha morcha planning
Gopinath Munde Memorial Controversy: 'AIMIM' इम्तियाज जलील यांना थेट बीड, परळीतून धमक्या; काय होतं कारण...

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला मे महिन्यात सर्व याचिकांवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबतची नव्याने सुनावणी आजपासून मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. विशेष खंडपीठासमोर आज सायंकाळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुनावणी होईल. त्यामुळे आरक्षण वैध ठरणार की नाही, याची फैसला होणार आहे.

Mumbai Maratha morcha planning
Trupti Desai On Women Commission : ज्योती साळुंके हुंडाबळी प्रकरणाचं 'रि-इन्वेस्टिगेशन'; तृप्ती देसाई महिला आयोगाच्या अध्यक्षांवर कडाडल्या

आरक्षणाच्या विरोधात याचिका करणाऱ्यांनी SBCअंतर्गत मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्याने आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्याचा आक्षेप घेत त्याला विरोध केला होता. यानंतर आरक्षणाच्या समर्थनार्थ देखील याचिका करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी आता मुंबई उच्च न्यायालयात होत आहे.

आरक्षणाच्या विरोधात याचिका करणाऱ्यांनी SBCअंतर्गत मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्याने आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्याचा आक्षेप घेत त्याला विरोध केला होता. यानंतर आरक्षणाच्या समर्थनार्थ देखील याचिका करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी आता मुंबई उच्च न्यायालयात होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com