Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

Manoj Jarange Patil : मी कट्टर हिंदू पण औरंगजेबाच्या कबरीवर..., 'त्या' व्हिडिओवर जरांगे पाटलांचं स्पष्टीकरण

Manoj Jarange Patil On Beed Violence : ""मराठ्यांच्या मुलांना बीड जिल्ह्यात विनाकारण मारहाण झाली, गेवराई, बीड, रायमोह, माजलगाव आदी ठिकाणी जातीयवादाच्या नावाखाली हाणामारी सुरू आहे."
Published on

दिलीप दाखने

Beed Maratha Reservation : आक्षेपार्ह पोस्टवरुन बीडमधील वातावरण तापलं आहे. सध्या बीडमध्ये तणावपूर्ण शांतता असून जिल्ह्यातील पाथर्डी, शिरुर शहरात बंद पुकारण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण बिघडलं आहे.

अशातच आता मनोज जरांगे यांचादेखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी, मी पण कट्टर हिंदू असून तो व्हिडीओ खोटा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील पाथर्डी, शिरुर शहरात बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर, परळी शहरातही बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पोलिस प्रशासन येथे अलर्ट मोडवर आहे.

एकीकडे पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे दोन समाजात तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे एखाद्याने पोस्ट टाकली म्हणून संपूर्ण समाजाला दोष देणं चुकीचं असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे हे पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत.

उपोषणाच्या दुसऱ्यादिवशी त्यांनी सरकारशी चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलं आहे.मात्र, अद्याप सरकारकडून कोणताही संपर्क झाला नाही. सरकारची काय भावना आहे? हे मला माहिती नसल्याचं जरांगे यांनी सांगितलं.

दरम्यान, यावेळी त्यांनी बीडमधील तणावाच्या परिस्थिवर भाष्य केलं. ते म्हणाले, "मराठ्यांच्या मुलांना बीड जिल्ह्यात विनाकारण मारहाण झाली, गेवराई, बीड, रायमोह, माजलगाव आदी ठिकाणी जातीयवादाच्या नावाखाली हाणामारी सुरू आहे.

गृहमंत्री आणि बीडच्या पोलिस अधीक्षकांनी या घटनांना आवर घालावा. खोट्या गोष्टींच्या नावाखाली मराठा समाजला त्रास देऊ नका. मराठा समाजाने शांत राहावे, नरड्याला लागेपर्यंत सहन करू पण आम्ही सतत अन्याय सहन करणार नाही.

Manoj Jarange Patil
Raksha Khadse Politics : वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जळगावला मिळाले केंद्रात मंत्रीपद !

मी कट्टर हिंदू आहे पण...

मराठ्यांच्या मुलांनी शांत राहवे, नेकनूरला पिरावर चादर चढवली, मला हिंदू धर्माचा गर्व आहे. मुस्लिम बांधवांना त्यांच्या धर्माचा अभिमान असावा. मी कट्टर हिंदू आहे पण औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली असा एक व्हिडीओ व्हायरल केला जातोय, हे चुकीचं असल्याचं जरांगे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com