Manoj jarange News : मनोज जरांगेंनी घेतली संभाजीराजेंची बाजू ; म्हणाले, 'एकाकी नाहीत...'

Sambhaji Raje News : बीड येथे उपचार घेत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना शनिवारी सुटी देण्यात आली. 20 तासांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली.
Sambhaji Raje Chhatrapati Manoj Jarange Patil
Sambhaji Raje Chhatrapati Manoj Jarange Patil sarkarnama
Published on
Updated on

Beed News : शिक्षक, डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यातील भाषणादरम्यान अचानक अशक्तपणा व रक्तदाब कमी झाल्याने बीड येथे उपचार घेत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना शनिवारी सुटी देण्यात आली. 20 तासांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. दरम्यान, संभाजीराजे हे एकाकी नाहीत आपण त्यांच्यासोबत आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

शुक्रवारी (ता. 28) रात्री मेळाव्यासाठी आलेल्या जरांगे यांची भाषणादरम्यान प्रकृती बिघडली. त्यांना रात्री दहा वाजता येथील मेडीकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. सुनील बोबडे, डॉ. प्रदीप शेळके, डॉ. संकेत बाहेती या तज्ज्ञांनी त्यांच्या विविध चाचण्या करुन उपचार केले.

Sambhaji Raje Chhatrapati Manoj Jarange Patil
Shivsena vs BJP : ठाकरेंच्या पठ्ठ्यानं टायमिंग साधलं, फडणवीसांचा जुना व्हिडिओ काढला बाहेर

शरीरातील पाणी कमी झाल्याने त्यांचा रक्तदाब कमी होऊन त्यांना अशक्तपणा आला होता. शनिवारी सहा वाजता जरांगे यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, जरांगेंना भेटण्यासाठी समर्थकांची रुग्णालय परिसरात रात्रीपासून ते शनिवारी दिवसभर मोठी गर्दी होती. दरम्यान, यावेळी महंत शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली.

Sambhaji Raje Chhatrapati Manoj Jarange Patil
BJP : भाजपची दणक्यात सदस्य नोंदणी, दीड कोटींकडे वाटचाल; पडद्यामागून माधवी नाईक यांनी हलवली सूत्र

कुत्रे, मांजरावरून जातीय तेढ

संभाजीराजे एकाकी नाहीत आपण त्यांच्यासोबत आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कुत्रे आणि मांजरावरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या मुद्द्यावर भूमिका घेणारे संभाजीराजे एकाकी नाहीत, आपण त्यांच्या सोबत आहोत.

संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आरोपी फासावर गेले पाहिजेत. मात्र, अलीकडे समोर येत असलेल्या माहितीवरुन सरकारला याच गांभीर्य दिसत नाही. या प्रकरणात पोलिसांना देखील सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणीही जरांगेंनी केली.

दुर्लक्ष करणारे पोलीस मारणाऱ्यांपेक्षा दोषी आहेत, त्यांच्यावरही कारवाई केली पाहीजे. अधिकाऱ्यामुळेच खून झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाला दुसरीकडे नेण्याचा डाव असल्याचा संशयही व्यक्त करतानाच यात धनंजय मुंडे यांचीही खेळी असू शकते, असा आरोप जरांगेंनी केला.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com