Aurangabad Political News : राज्यातील खोके सरकारने बारसूच्या आंदोलकांवर, आळंदीतील वारकऱ्यांवर आणि आता मराठा समाजाच्या आंदोलकांवर ज्या लाठ्या-काठ्या चालवल्या, त्या एक एक काठीचा हिशेब ठेवला जाईल. (Opposition Leader News) महाराष्ट्रातील आणि देशातील जनता या सगळ्याची व्याजासकट परतफेड मतपेटीतून केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला आहे.
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) शांतपणे उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठ्या चालवल्या, छऱ्याच्या गोळ्या झाडत अमानूष मारहाण केली. (Shivsena) महिला-मुले कुणालाही सोडले नाही. या घटनेचा राज्यभरात तीव्र निषेध केला जात आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत, रास्तारोको, तर कुठे हिंसक आंदोलने केली जात आहेत.
अंतरवालीमध्ये काल राज्यभरातल्या सगळ्या पक्षांचे नेते येऊन आंदोलकांना भेटून गेले. शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आंदोलकांची भेट घेऊन आपण व आपला पक्ष त्यांच्या पाठीशी (Marathwada) भक्कमपणे उभा असल्याची ग्वाही दिली.
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र अजूनही आदोलकांकडे फिरकलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहे. तुम्ही आंदोलकांवर चालवलेल्या प्रत्येक काठीचा हिशेब ठेवला जाईल, असा इशारा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला.
गेल्या वर्षभरात! बारसूच्या आंदोलकांवर काठ्या, आळंदीतील वारकरी बांधवांवर लाठीमार, जालन्यात शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा बंधू भगिनींवर लाठीमार. खोके सरकारच्या एक एक काठीचा हिशेब ठेवला जाईल. याचे उत्तर मतपेटीतून व्याजासकट महाराष्ट्रातील आणि देशातील विद्यमान सत्ताधाऱ्यांना नक्की मिळेल, अशा शब्दात दानवे यांनी सरकारवर टीका केली.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.