Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटलांनी मैदान मारले! अंतरवालीत गुलाल उधळला..

The Maratha community marked a historic victory as celebrations erupted in Antarwali : आरपारची लढाई करण्यासाठी 27आगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले होते.
Celebration In Antarwali News Jalna
Celebration In Antarwali News JalnaSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil : ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन वर्षापुर्वी अंतरवाली सराटीतून सुरू केलेला लढा अखेर मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जिंकलाच. हैदराबाद गॅझेट लागू करण्यासह ज्या मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या होत्या, त्या सगळ्या मान्य करण्यात आल्या आहेत. तिकडे राज्याच्या राजधानीत गुलाल उधळला जात असताना ज्या अंतरवालीतून या ऐतिहासिक लढ्याला सुरूवात झाली होती, तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली.

गावातील महिला, वृद्ध, लहान मुले, तरुण अशा सगळ्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सुटल्यानंतर अंतरवालीत एकच जल्लोष केला. एरवी गर्दीने खच्चून भरलेल्या अंतरवालीत आज तुरळक गर्दी असली तरी मुंबईतील आंदोलक गावात परतल्यानंतर न भुतो न भविष्यती असा आनंदोत्सव गावात साजरा करण्याची तयारी ग्रामस्थानी चालवली आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाच दिवसांपासून सुरू असलेल्या लढ्यानंतर यश आले.

आरपारची लढाई करण्यासाठी 27आगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले होते. (Maratha Reservation) गेल्यावर्षी मुंबईच्या वेशीवर वाशीत मराठा आंदोलकांना सरकारकडून रोखण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन मागण्या मान्य करत असल्याचा अद्यादेश देत त्यांचे उपोषण संपवले होते. परंतु सरकारने तेव्हा दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले होते.

Celebration In Antarwali News Jalna
Manoj Jarange Patil : जरांगेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस..., भाजपनेही म्हटले; 'बस… आता थांबा जरांगेजी!'

यावेळी कुठल्याही परिस्थिती आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. मराठा समाजाला विश्वास देत लाखो आंदोलकांना घेऊन 29 रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईचे आझाद मैदान गाठले होते. पाच दिवसांच्या उपोषणानंतर अखेर सरकार नमले आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. एवढेच नाही तर त्याचा जीआरही काढला. मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी सात उपोषण केली.

Celebration In Antarwali News Jalna
Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटलांच्या समर्थकांनी केले छगन भुजबळांचे तोंडभरून कौतुक, आपल्याच नेत्यांना सुनावले खडे बोल!

आज हैदराबाद गॅझेट व सातारा संस्थानचे गॅझेट तसेच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करणार असल्याचा अधिकृत अध्यादेश मराठा उपसमतीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना दिला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतले. या मोठ्या विजयाचा जल्लोष अंतरवालीत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी व महिलांनी फुगडी खेळत साजरा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com