
मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत आहेत.
न्यायालयाने आंदोलकांना गणेश विसर्जनाआधी खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपने आंदोलन थांबवण्याची मागणी केली असून केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Mumbai News : गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांना रोखा, तसेच जे आंदोलक आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी रस्त्यावर बसले आहेत, त्यांना गणेश विसर्जनाच्या आधी खाली करण्यात यावे. या आदेशानंतर राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. तसेच पोलिसांनी आझाद मैदान रिकामे करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. अशातच भाजपनेही सोशल मीडियावर पोस्ट करून मुकमोर्चांचे दाखले देत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन थांबवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राज्य भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
केशव उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये, ज्या समाजाने लाखोंचे यशस्वी मूक मोर्चे शांततेत काढले, तो हाच का मराठा समाज अशी शंका यावी असे चित्र गेले 4/5 दिवस मुंबईत सुरू आहे. छत्रपतींचा मावळा ही आपली ओळख पण आंदोलनातील हौशे गवश्यांनी जे केले ते प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ‘ते आमचे नव्हेत’ असे म्हणून जबाबदारी झटकता येईल पण वस्तुस्थिती बदलणार नाही.
प्रत्येक आंदोलन यशस्वी होण्यासाठी थोडे मागेपुढे करावे लागते. काही वेळा थांबावे लागते. महत्मा गांधीनी सुध्दा काही वेळा आंदोलन स्थगित केले. मराठा समाजाच्या वेदना आपण सगळ्यासमोर आणल्यावर मराठा समाजाला आता 10 टक्के आरक्षण सध्या लागू झाले आहे.
आता वेळ आहे थांबण्याची!.. आपल्या बहुतांशी मागण्या महायुती सरकारने पूर्ण केल्या आहेत. राहिला प्रश्न, ओबीसी कोट्यातून आरक्षण घेण्याचा. भाजपची भूमिका तर स्पष्ट आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
पण यावर आपल्यासोबत असण्याचा दावा करणारे मविआतील घटक पक्ष, शरद पवार, व काँग्रेसची यावर काय भूमिका आहे ते स्पष्ट विचारा. उद्धव ठाकरेंना या प्रश्नातले फारसे ज्ञान नसल्याने ते मूग गिळून बसतील, पण मविआतील ही मंडळी केवळ गोल गोल करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा, दोन समाजसमूहांना झुंजत ठेवून मविआतील तीन पक्षांना राजकारण करायचे आहे, हे लक्षात घ्या, आणि आपल्या आंदोलनात आपल्या खांद्यावरून कुणी मतांची बेजमी करण्याच स्वप्न पहातेय ही नामुष्की टाळण्यासाठी आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा!, असे आव्हान त्यांनी केले आहे.
प्र.१: मनोज जरांगे पाटील का उपोषण करत आहेत?
👉 ते मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत आहेत.
प्र.२: न्यायालयाचा आदेश काय आहे?
👉 मुंबईतील आंदोलकांना गणेश विसर्जनाआधी हटवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
प्र.३: भाजपची भूमिका काय आहे?
👉 भाजपने आंदोलन थांबवावे अशी मागणी केली आहे.
प्र.४: कोणत्या नेत्याने सोशल मीडियावर पोस्ट केली?
👉 भाजप नेते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करून प्रश्न उपस्थित केले.
प्र.५: आंदोलनाला किती समर्थन मिळत आहे?
👉 हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल होऊन आंदोलनाला समर्थन देत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.