Dharashiv Loksabha 2024 : धाराशिवमधून मराठा समाज एक हजाराहून अधिक अर्ज दाखल करणार

Maratha Reservation : राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली, असा आरोप केला जातोय.
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : मागील सात महिन्यापासून राज्यात ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन, निदर्शने, मोर्चे अशा विविध प्रकारांनी लक्ष वेधले जात आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण जाहीर केले. मात्र ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरूच आहे. राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली, असा आरोप केला जातोय.

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता मराठा आरक्षणाचा विषय काहीसा लांबणीवर पडणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात संवाद सभा घेऊन आपली मागणी आणि त्यावर ठाम राहण्याचे आवाहन मराठा समाजाला करत आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची कोंडी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकेका मतदारसंघातून हजारो उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी एकनाथ शिंदेंच्या 'या' आमदाराची फोडली गाडी!

त्यानूसार गेल्या महिन्यात मनोज जरांगे पाटील यांचा धाराशिव दौरा पार पडला. या दौऱ्यानंतर गावागावात अनेक बैठका होऊन प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय झाला आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जास्त उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यास काय करायचे? याविषयी मार्गदर्शन मागितले आहे.

निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली असून निवडणुकीची वेळापत्रकही जारी करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या निर्णयानूसार धाराशिव लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे एक हजाराहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकारांना रविवारी देण्यात आली. बलराज रणदिवे, अक्षय नाईकवाडी, निखील जगताप, अभिजित सूर्यवंशी, अमोल जाधव, संकेत सूर्यवंशी, रणधीर सूर्यवंशी, प्रतिक बारकुल, सुधीर पवार या संभाव्य उमेदवारांसह समाजबांधवांनी याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

Maratha Reservation
Ambadas Danve On BJP News : तेव्हा शिवसेनाप्रमुख नव्हते, हे तुम्ही भाग्य समजा; बावनकुळेंच्या ट्विटनंतर दानवेंनी सुनावले..

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन सुरु असताना सरकारकडून दडपशाहीचे धोरण अवलंबले जात आहे. विद्यमान सरकारने दहा टक्के आरक्षण जाहीर केले असले तरी ते कायद्याने टिकणार नाही. त्यामुळे कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण ओबीसीमधूनच मिळावे, अशी आमची मागणी आहे. परंतु आचारसंहिता लागू झाली तरी आंदोलकांना नोटिसा बजावून गुन्हे दाखल करुन समाजात दहशत माजविण्याचे काम सरकार करत आहे.

त्यामुळे समाजात असंतोषाची लाट उसळली आहे. सरकारता आता धडा शिकवण्यासाठी लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावातून दोन ते पाच उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. समाजाची ताकद आता सरकारला दाखवून देण्यासाठी सकल मराठा समाजाने ही भूमिका घेतली असून धाराशिव जिल्ह्यातून एक हजाराहून अधिक उमेदवारी अर्ज लोकसभा निवडणुकीत दाखल करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदरील उमेदवारांची अनामत रक्कम गावागावातील मराठा कुटुंबातील लोक वर्गणी जमा करुन भरणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com