Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी एकनाथ शिंदेंच्या 'या' आमदाराची फोडली गाडी!

Maratha Reservation Movement : जाणून घ्या, कोण आहेत आमदार आणि नेमकी कुठं घडली घटना?
MLA kalyankar
MLA kalyankarSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करण्याच्या आवहनाची पडसाद उमटताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये राजकीय नेत्यांबद्दलचा रोष कुठल्या ना कुठल्या प्रकारे व्यक्त होत आहे. नांदेड उत्तरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार बालाजी कल्याणकर यांनाही अशाच रोषाला सामोरे जावे लागले.

अर्धापूर येथे एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या कल्याणकर यांच्या उभ्या असलेल्या कारवर अज्ञातांनी दगड घालत ती फोडण्याचा प्रयत्न केला. रविवारी (ता. 17) अर्धापूर तालुक्यातील एका विवाह सोहळ्यात वधु-वराला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमदार कल्याणकर हे आपल्या समर्थकांसह कारने आले होते. याची माहिती मिळताच अज्ञातांनी कारच्या काचा फोडत एक मराठा लाख मराठा, समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA kalyankar
Lok Sabha Election 2024 : विमानात बसण्यापूर्वी उमेदवारीसाठी शिरसाटांकडून खैरेंना शुभेच्छा; पण...

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानूसार राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच आमच्या घरी पुढाऱ्यांनी येऊ नये ,असे पोस्टर दारावर लावण्यात येत आहेत. जरांगे पाटील यांच्या मराठवाड्यासह राज्यभरातील संवाद सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. जरांगे पाटील यांच्या आवहनानंतर लोकप्रतिनिधींना गाव बंदी केली जात आहे.

आधी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपाचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांना मराठा समाजच्या तरुणांनी गावातून हुसकावून लागवे होते. त्यानंतर आज अर्धापूर तालुक्यात आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कारच्या काचा फोडत त्यांना विरोध करण्यात आला. कल्याणकर हे अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. ते विवाह सोहळ्यासाठी टाकलेल्या मंडपात बसले होते.

MLA kalyankar
Arjun Khotkar News : विरोधकांना मान अन् मित्रपक्षाचा अपमान? खोतकरांनी लावला नाराजीचा सूर...

कार मंडपापासून काही अंतरावर उभी करण्यात आली होती. कारचालक गाडी जवळ नसतांना अज्ञातांनी मागच्या बाजूने गाडीवर दगड घालत ती फोडली. या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी डेनियल बेन, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com