Caste Certificate: मराठा कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले, राष्ट्रवादीच्या झेडपी सदस्य कोमल पारवेंची न्यायालयात धाव

Parbhani ZP News: मराठा कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारे इतर मागास वर्ग प्रवर्गातून जिल्हा परिषद, नगपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील तीन सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
Caste Certificate
Caste Certificate sarkarnama
Published on
Updated on

Parbhani Politics : मराठा कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारे इतर मागास वर्ग प्रवर्गातून जिल्हा परिषद, नगपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील तीन सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. याच मुद्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवले आहे.

जात प्रमाणपत्र रद्द ठरवलेल्या झेडपी सदस्यांपैकी परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील गौर गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या कोमल पारवे यांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. आपले जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय हा राजकीय दबावातून घेण्यात आला असा आरोप त्यांनी केला आहे.

गौर (ता. पूर्णा) जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोमल गंगाधर पारवे यांनी त्यांच्या जात पडताळणी समितीच्या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे सांगीतले.

कोमल पारवे या जिल्हा परिषद गौर सर्कल मधून निवडून आलेल्या आहेत. त्यांनी मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित गटातून निवडणूक लढली आणि विजयी झाल्या आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेण्यात आला होता.

Caste Certificate
FDA Tukaram Mundhe: मोठी बातमी: एफडीएच्या धडक कारवायांनी भेसळखोरांना दणका दिल्यानंतर तुकाराम मुंढेंचं पुढचं 'टार्गेट' ठरलं

जात पडताळणीत त्यांना उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र नुकतेच रद्द ठरविण्यात आले. या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निवडणुकीमध्ये मायबाप जनतेने मला भरभरून मत दिल्याने माझा विजय झाला. हा विजय विरोधकांच्या जिव्हारी लागला. त्यांनी माझ्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेतला.

माझे महसुली पुरावे सक्षम आहेत. जिल्हा जात पडताळणी समितीने राजकीय दबावातून माझे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले. या संदर्भात दाद मागण्यासाठी मी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यात आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. माझा न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे कोमल पारवे यांनी म्हटले आहे.

Caste Certificate
Supriya Sule PC: पीएम मोदींच्या भेटीपूर्वीच सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेतच टाकला नवा बॉम्ब; सरकारच्या महत्त्वाच्या विधेयकाला दर्शवला विरोध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com