Prakash Ambedkar : हाकेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; मराठा अन् ओबीसी आरक्षणाचं ताट...

Laxman Hake, Navnath Waghmare : प्रकाश आंबेडकरांनी उपोषणस्थळी जाऊन हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली. त्यांना पाणी पिण्याचा आग्रह केला
Prakash Ambedkar, Laxman Hake, Navnath Waghmare
Prakash Ambedkar, Laxman Hake, Navnath WaghmareSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र सापडलेल्या लोकांच्या सग्यासोयऱ्यांनाही ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली आहे. त्याला विरोध करत ओबसी समाजाकडून आरक्षण बचाव आंदोलन सुरू केले आहे.

आता या दोन्ही आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांनी मोठं विधान केले आहे. मराठा आणि ओबीसींचे ताट वेगवेगळे असावे, असे आंबेडकारांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

ओबीसी आरक्षण बचावासाठी जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके Laxman Hake आणि नवनाथ वाघमारे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रकाश आंबेडकरांनी उपोषणस्थळी जाऊन हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली. त्यांना पाणी पिण्याचा आग्रहही केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षण वेगवेगळे असले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar म्हणाले, आरक्षणाच्या मुद्द्यांकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आता राज्यात असलेल्या भटका विमुक्तांचे आरक्षण टिकते की नाही, अशी स्थिती आहे. राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आरक्षणाबाबत भूमिका घ्यायला हवी. आमची भूमिका पूर्वीच स्पष्ट केलेली आहे, की ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळेच असले पाहिजे.

Prakash Ambedkar, Laxman Hake, Navnath Waghmare
Marathwada BJP : राज्यसभेच्या तीन रिक्त जागांवर भाजप कोणाचं चांगभलं करणार?

लोकसभेत लोकांनी संविधान बदल्याच्या विरोधात मतदान केले आहे. यातून ओबीसींनी संविधानावर विश्वास दाखवून दिला आहे, असे मला वाटते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेगळ्या ताटाची सोय करावी लागेल. मनोज जरांगे पाटलांशी Manoj Jarange चर्चा करता त्यांना सगेसोयरे या शब्दाची व्याख्या करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते, असेही आंबेडकरांनी यावेळी म्हटले.

(Edited by Sunil Dhumal)

Prakash Ambedkar, Laxman Hake, Navnath Waghmare
Video Vijay Wadettiwar : लक्ष्मण हाकेंना पाहताच वडेट्टीवारांना अश्रू अनावर! थेट शिंदेंना फोन अन्...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com