Video Vijay Wadettiwar : लक्ष्मण हाकेंना पाहताच वडेट्टीवारांना अश्रू अनावर! थेट शिंदेंना फोन अन्...

OBC Reservation Laxman Hake Navnath Waghmare Vijay Wadettiwar : लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा गुरूवारी आठवा दिवस आहे. विजय वडेट्टीवार यांनी उपोषणस्थळी पोहचून आंदोलनाला पाठिंबा दिला.
Vijay Wadettiwar Laxman Hake
Vijay Wadettiwar Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Jalna Latest Politics : मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा गुरुवारी आठवा दिवस आहे. काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषणस्थळी जाऊन हाकेंची तब्बेतीची विचारपूस केली.

हाके यांच्यासोबत नवनाथ वाघमारे हेही उपोषण करत आहेत. वडेट्टीवार यांनी यापुर्वीच या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर त्यांनी गुरूवारी उपोषणस्थळी जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यांची खालावलेली प्रकृती पाहून वडेट्टीवारांना अश्रू अनावर झाले.

Vijay Wadettiwar Laxman Hake
Video Amol Mitkari On Ramdas Kadam : "...म्हणून तुमची लंगोट वाचली," मिटकरींनी रामदास कदमांना सुनावलं

हाके यांच्या तब्बेतीची विचारपूस करत असतानाच वडेट्टीवारांच्या डोळे पाणावले. भावूक झालेल्या वडेट्टीवारांनी त्यानंतर स्वत:ला सावरत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. दोघांमधील संवाद उपस्थितांनाही स्पीकरवरून ऐकवण्यात आला.

शुक्रवारी येणार शिष्टमंडळ

वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना हाकेंच्या मागण्यांविषयी सांगत त्यांची दखल घेण्याची विनंती केली. सरकारी शिष्यमंडळ हाकेंच्या भेटीसाठी न आल्याबद्दल त्यांनी आधी नाराजीही व्यक्त केली.

Vijay Wadettiwar Laxman Hake
Sunil Tatkare On BJP : भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोंडी? सुनील तटकरेंनी जिल्हा विभाजनाच्या अजेंड्याची स्थिती सांगितली

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारीच शिष्टमंडळ पाठवतो, असे आश्वासन दिले. ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, हाकेंनी तब्बेतीची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्री शिंदे फोनवर बोलताना म्हणाले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com