Manoj Jarange : अशोक चव्हाण अन् संदीपान भुमरे तातडीने मनोज जरांगेंच्या भेटीला

Ashok Chavan & Sandipan Bhumre : मनोज जरांगे शनिवारपासून राज्यभर पाच टप्प्यांत शांतता रॅली काढणार आहेत. त्यापूर्वीच सरकारच्या वतीने दोन खासदारांनी त्यांची भेट घेतली.
Sandipan Bhumre, Ashok Chavan, Manoj Jarange
Sandipan Bhumre, Ashok Chavan, Manoj Jarange Sarkarnama

Maratha Reservation News : मराठा समाजाला सगेसोयऱ्यांबाबत निर्णय घेण्यास आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यापूर्वीच जरांगेंनी उद्या शनिवारपासून राज्यभर शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. त्यापूर्वीच सरकारच्या वतीने खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेंची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली आहे.

मनोज जरांगे Manoj Jarange मराठवाड्यातून शांतता रॅली सुरू करणार आहेत. ही रॅली राज्यभर पाच टप्प्यात होणार आहे. त्यापूर्वीच खासदार चव्हाण आणि भुमरे यांनी जरांगेंची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झाल नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सावध भूमिका घेण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, जरांगे हे सगे सोयरेंच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत. त्याला ओबीसी नेत्यांचाही तीव्र विरोध आहे. परिणामी सरकारपुढे राज्यातील स्थितीबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. या भेटीत राज्यातील स्थितीवरही चव्हाण, भुमरे आणि जरांगे यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामगे मराठा समाजाची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आता काही महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यासाठी सरकार कोणतीही रिस्क घेणार नाही. या पार्श्वभूमीवर ८ जुलै रोजी शिंदे समिती हैदराबाद दौऱ्यावर जाणार आहेत. या चार दिवसांच्या दौऱ्यात ही समिती जरांगेंच्या हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणीच्या मागणीबाबत पुरावे गोळा करणार आहे.

Sandipan Bhumre, Ashok Chavan, Manoj Jarange
Eknath Shinde & Warkari : वारकरी महामंडळामागं सरकारचा राजकीय डाव? वारकऱ्यांचा थेट CM शिंदेंनाच इशारा

सगेसोयऱ्यांच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक विचार करत असून जरांगेंनी चुकीचा समज डोक्यातून काढून टाकावा, असे मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde यांनी शब्द दिल्याचे मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितले होते. मात्र सग्यासोयऱ्यांची मागणी पूर्ण केली नाही तर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. 13 जुलैपर्यंत सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर राज्यातील 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे याचा विचार करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sandipan Bhumre, Ashok Chavan, Manoj Jarange
Rahul Gandhi Vs BJP : आषाढी वारीत राहुल गांधी...; भाजप नेत्यांची एवढी 'मळमळ' का ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com