Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी पठ्ठ्यानं रेखाटलं स्वतःच्या रक्तानं जरांगेंचं चित्र!

Maratha Reservation : चित्रकार डॉ.संदीप डाकवे यांनी स्वतःच्या रक्ताने जरांगे पाटील यांचं चित्र रेखाटलं आहे.
Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Jalna : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. राज्यभर मराठा समाजाने आपला लढा तीव्र केला आहे. सकल मराठा मोर्चाचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत.

जरांगे पाटलांनी सुरु केलेल्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी राज्यभर सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषणास सुरवात झाली आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांनी स्वतःच्या रक्तानं जरांगे पाटलांचं चित्र रेखाटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'चुलीत गेले नेते, अन् चुलीत गेला पक्ष'

'चुलीत गेले नेते, अन् चुलीत गेला पक्ष' मराठा आरक्षण एकच लक्ष' असे फलक गावोगावी झळकत आहेत. राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी असं फलकावर लिहिलं आहे. जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत नेत्यांना गावात प्रवेश बंदी, असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

Manoj Jarange Patil News
Devendra Fadnavis : सदावर्ते कुणाचा माणूस? हे सर्वांना ठाऊक; फडणवीसांचा रोख कुणाकडे?

"लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे"

बीडच्या वडवणी शहरात 'हम सब जरांगे' अशी घोषणाबाजी करत मराठा बांधवांनी कॅन्डल मार्च काढला. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ वडवणी तालुक्यात मागील 55 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. चिंचाळा आणि सोन्नाखोटा या ठिकाणी उपोषण सुरू आहेत. "लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे" अशा घोषणांनी शनिवारी वडवणी शहर अक्षरशः दुमदुमून गेले होते.

बीडमध्ये एसटी बस सेवा ठप्प

बीडमधून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटल्याचं चित्र आहे. काल (शनिवारी) रात्री अचानक धुळे-सोलापूर महामार्गावर बीडच्या महालक्ष्मी चौकामध्ये टायर जाळून बस अडविण्यात आली. वडगाव फाट्यावर बीड-कोल्हापूर ही स्लीपर एसटी बस जाळण्यात आली. बीडमध्ये एसटी बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे.

प्रवाशांचे मात्र हाल सुरू

रात्री बस पेटवून दिल्याने बीड बसस्थानकातून एकही बस आज आगातून बाहेर सोडली जात नसून त्यामुळे अद्याप एकही बसफेरी झाली नाही. त्याचबरोबर जिल्ह्यातील आठही आगारातील बस फेऱ्या रद्द केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. सध्यातरी बस फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल सुरू झाले आहेत.

Manoj Jarange Patil News
Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे अपात्र झाले तरीही मुख्यमंत्री राहतील; फडणवीसांनी सांगितलं कारण..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com