Maratha Reservation : "मराठ्यांविरोधात काही OBC नेत्यांचं षडयंत्र"; भुजबळांच्या आरोपांवर जरांगे पाटील थेट बोलले...

Maratha Reservation Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दाचा पेटला आहे. छगन भुजबळांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता मनजो जरांगे पाटीलही सरसावले आहेत...
Maratha Reservation News
Maratha Reservation News Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण ओबीसीमध्ये नको अशी भूमिका ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी घेतली. भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारलाच घरचा अहेर दिला. आता मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर सरकारचं शिष्टमंडळ उद्या जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.

ओबीसी नेत्यांबद्दल मी काही बोलणार नाही. आपल्या गोरगरीब मुलांचं कल्याण होतंय, हे मराठा समाजाला माझं आवाहन आहे. ओबीसी बांधवही आमच्या सोबत आहेत. पण ओबीसींमधील दोन-तीन नेत्यांना मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाहीये. मराठ्यांनी एकजूट वाढवावी. पण शांततेत. आणि आता जाणूनबुजून षडयंत्र रचलं जात आहे. महाराष्ट्रातील मराठा नेत्यांनी हे लक्षात घ्यावं, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Maratha Reservation News
Manoj Jarange On Fadnavis : " ते चौकटीच्या बाहेरचं काही बोलले नाहीत, मी पण..."; फडणवीसांच्या फोनवरून जरांगेचं मोठं विधान

शांततेत आंदोलना करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जात आहे. याकडे मराठा नेत्यांनी लक्ष द्यावं. त्यांना मराठा नेत्यांनी मदत करावी. आणि नेत्यांनी मदत केली नाही तर ते मुलं आणि महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

भुजबळांच्या नातेवाईकाचं हॉटेल फोडलं ते त्यांच्याच समाजातील जवळच्याच लोकांनी फोडलं. त्यांना अटकही केली गेली आहे, अशी मला खात्रीलाय माहिती मिळाली आहे. सत्ताधाऱ्यांचेच लोक मराठ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे आता तंतोतंत खरं होत आहे. महाराष्ट्रातही अशाच प्रकारे त्यांच्या पूर्वीच्या द्वेषातून घरं फोडली. आणि मराठ्यांचं शांततेत आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना अशा गोष्टींशी काहीही देणं घेणं नाही. हे षडयंत्र मराठ्यांविरोधात रचलं जात आहे, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा नेत्यांनी षडयंत्र हाणून पाडावं- जरांगे

मराठ्यांच्या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. पाच दहा हजार तरुणांवर गुन्हे दाखल करून मराठा समाजाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. आणि हे षडयंत्र असल्याने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी हे मनावर घ्यावं. अन्यथा पुढे आमच्या गाठ आहे. आम्ही खचणारही नाही आणि भीणारही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठ्यांच्या सामान्य आणि गोरगरीब मुलांना गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी पदाचा दुरुपयोग केला जात आहे. बीड, नांदेड महाराष्ट्रातल्या इतर पोलीस अधीक्षकांवर आणि तिथल्या पोलीस यंत्रणावर दबाव आणला जात आहे. आणि ओबीसींच्या काही नेत्यांचं हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र मराठा नेत्यांनी हाणून पाडावं, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.

'आम्ही कमी नाही, होऊ द्या जातीनिहाय जनगणना'

होऊ द्या जातीनिहाय जनगणना. आम्ही राज्यातही ५४ ते ६० टक्के एवढा मोठा मराठा समाज आहे. आणि देशात आमची संख्या ३२ कोटी इतकी आहे. आम्हीही कमी नाहीत. तुम्ही आम्हाला भाग पाडू नका. आम्ही शांततेत आंदोलन करणार, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीवरून जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे.

ओबीसी नेत्यांनी आम्हाला चोहू बाजूनी बांधलं आहे. हा दोर कापण्याची ताकद सामान्य मराठ्यांमध्ये आहे. आमचं शांततेत सुरू असलेलं आंदोलन मोडण्याचं काम ओबीसी नेत्यांनी चालवलं आहे. त्यांना वठणीवर आणायची ताकद आमच्यात आहे, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळणार हे ओबीसींना लक्षात आलं आहे. आणि म्हणून ओबीसींच्या एक-दोन नेत्यांचा थयथयाट चाललाय. सामान्य ओबीसी आमच्या सोबत आहेत. पण काही ओबीसी नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी थयथयाट करत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Maratha Reservation News
Chhagan Bhujbal : 'कळू द्या कोणता समाज किती मोठा आहे'; मंत्री भुजबळांनी केली मोठी मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com