Jalna Protest News
Jalna Protest News Sarkarnama

Jalna Protest News : एसटी गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या ५२ जणांवर गुन्हा दाखल ; सातव्या दिवशी उपोषणकर्ते मागणीवर ठाम..

Maharashtra Politics : सातव्या दिवशीही मराठा आरक्षणच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावातील उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत.

Jalna News : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारांनंतर राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले, जालन्यात एसटी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणी ५२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना येथे झालेल्या लाठीमारावरुन राज्यभरात वातावरण तापल्यानंतर एकाच दिवसात जालन्यात १६ एसटी बस जाळण्यात आल्या. तीन एसटी बसची तोडफोड करण्यात आली. या जाळपोळ प्रकरणात ४ कोटी ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे जालना परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Jalna Protest News
One Nation, One Election : 'एक देश एक निवडणूक' बाबत मनसेकडून भूमिका स्पष्ट ; आमदार राजू पाटील म्हणाले...

वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत परिवहन नियंत्रकांनी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बदनापूर शहरातही सरकारी वाहनांची जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna Protest News
Jalna Maratha Protest : अजितदादा, "हिंमत असेल तर कारवाई करुन दाखवा " ; पटोलेंचे आव्हान

सातव्या दिवशीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावातील उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. सातव्या दिवशी ही गावात तणावपूर्ण शांतता आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी उपोषणकर्त्यांच्या भेटी-गाठी सुरु केल्या आहेत. त्यातच पोलिसांनी मात्र या आंदोलन स्थळापासून काढता पाय घेतला आहे. पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात साडेतीनहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीहल्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. नांदेड जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड परिवहन विभागाने बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काल (शनिवारी) लांब पल्ल्याच्या गाड्या बंद केल्या होत्या. परंतु आज संपूर्ण बससेवा बंद करण्यात आली आहे. बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशाचे मोठे हाल होत आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com