Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुणबी सेनाप्रमुखांना जिवे मारण्याची धमकी

Maharashtra Politics : मनोज जरांगे यांचा आंदोलनाचा आज १४वा दिवस आहे.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama

Palghar News: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याला कुणबी सेनेने विरोध केला आहे. कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी जरांगेच्या अटकेची मागणी केली आहे. या मागणीनंतर विश्वनाथ पाटील यांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

विश्वनाथ पाटील यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून अश्लील शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी विश्वनाथ पाटील यांनी पालघरच्या विक्रमगड पोलिस ठाण्यात अज्ञान व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विक्रमगड पोलिस फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Maratha Reservation News
IAS in Big Tender : ९० कोटी रुपयांच्या `या` टेंडरमध्ये कोण मंत्री ? कुठच्या ‘आयएएस’ चा इंटरेस्ट ?

आरक्षणाच्या मुद्द्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आक्रमक होताना पाहावयास मिळत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज (सोमवारी) १४वा दिवस आहे.

Maratha Reservation News
Uddhav Thackeray News : 'त्या' फुग्यांना टाचणी लावण्याचे काम तुम्हाला करायचे; ठाकरेंचे जळगावकरांना आवाहन

कुणबी सेना ही समाजाच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तेवीस वर्षांपासून लढा देत आहे. कुणबी समाज ओबीसी प्रवर्गातील सर्वाधिक संख्या असलेला घटक आहे, असे असताना मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, जर मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यास कुणबी सेना व समस्त ओबीसी समाज तीव्र आंदोलन करतील, असा इशारा काही दिवसांपूर्वी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

कुणबी जातीला मराठा समाज हा तुच्छ लेखत असून, रोटी-बेटी व्यवहाराला मराठ्यांचा पूर्वीपासून विरोध आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी कुणबी सेनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com