Uddhav Thackeray News : 'त्या' फुग्यांना टाचणी लावण्याचे काम तुम्हाला करायचे; ठाकरेंचे जळगावकरांना आवाहन

Jalgaon Politics : पोलादी पुरुष म्हणवून घेणारे मणिपूरमध्ये कारवाई करतील का?
Uddhav Thackeray Sabha News
Uddhav Thackeray Sabha NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : "काही लोकांच्या डोक्यात हवा गेली. त्या हवेच्या जोरावर हे फुग्यासारखे हवेत गेले आहेत. त्या फुग्यांना टाचणी लावण्याचे काम तुम्हा सर्वांना करायचे आहे," असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावकरांना केले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांचे अनावरण ठाकरेंच्या हस्ते झाले. त्यावेळी ठाकरेंनी शिंदे गटाच्या नेत्यांवर तोफ डागली. खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते.

Uddhav Thackeray Sabha News
Chhagan Bhujbal News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांनी केलं शरद पवारांचं कौतुक; मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय...

"मी सत्तेसाठी धडपडत नाही. सत्ता आली काय गेली काय? देशाचे नेतृत्व करण्याची स्वप्नं मला पडत नाहीत. जागे करण्याचे काम मला वंश परंपरेने आले आहे. आमच्यावर सातत्याने टीका केली जाते की, शिवसेनेची काँग्रेस होईल. पंचवीस वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. तशीच काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही," अशा शब्दांत ठाकरेंनी विरोधकांना सुनावले.

Uddhav Thackeray Sabha News
Uddhav Thackeray News : शिवसेनेची स्थापना भाजपची पालखी वाहण्यासाठी नाही; ठाकरेंनी सुनावले

त्यांच्या कार्याची उंची केव्हा गाठणार?

"सरदार पटेल यांच्या कार्यामुळे त्यांना लोहपुरुष ही उपाधी जनतेने दिली आहे, आज काही जण पोलादी पुरुष म्हणवून घेतात, परंतु ते नावालाच आहेत. पटेलांच्या पुतळ्यांची उंची वाढविण्यापेक्षा तुमच्या कामाची उंची वाढवा. सरदार पटेलांनी मराठवाड्यात फौजा पाठवून निजामाला पळवून लावले. आजचे पोलादी पुरुष म्हणवून घेणारे मणिपूरमध्ये कारवाई करतील का? हे पोलादी नव्हे तकलादू पुरुष आहेत. मोदींनी पटेलांचा सर्वात उंच पुतळा उभा केला आहे, परंतु त्यांच्या कार्याची उंची केव्हा गाठणार? असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com