Maratha Reservation News : चर्चेसाठी या, दारे उघडी ; उपोषणाच्या पहिल्या दिवशी जरांगे पाटलांचे सरकारला आवाहन !

Manoj Jarange sat on the fast : राजकारण माझा धर्म नाही, मात्र मागण्या मंजूर नाही झाल्या तर सर्व धर्माच्या समाज बांधवांना सोबत घेऊन विधानसभेच्या 288 जागेवर उमेदवार उभे करणार
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

दिलीप दखने

Jalna News : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा आणि सरकारविरोधात असलेला रोष टाळा. उपोषण सुरू आहे, तोपर्यंत चर्चेसाठी या आमची दारे उघडी आहेत, अशा शब्दात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सरकारला आवाहन केले. मराठा समाजाला हक्काच आरक्षण देऊन समाजाचा रोष टाळा, असा सल्लाही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चार जून रोजी होणारे बेमुदत उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून आपले उपोषण अंतरवाली सराटीतून सुरू केले. पोलिसांची परवानगी, गावकऱ्यांचा आंदोलनाला विरोध या सगळ्या पार्श्वभूमीवर अंतरवाली आज काय घडते? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. परंतू ग्रामपंचायतीने ठराव घेत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी दिली आणि पुढील संघर्ष टळला.

आम्हाला राजकारण करायचे नाही,मला स्वतःला राजकारणात रस नाही,ते माझे क्षेत्र नाही, माझ्या समाजालाही राजकारण करायचे नाही, पण मराठा समाजाला हक्काचे आरक्षण द्यायला तुम्ही टाळाटाळ करणार असाल तर मात्र विधानसभेला 288 मतदारसंघात सर्व जाती-धर्माचे उमेदवार दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

मी आरक्षणासाठी आठ महिन्या पासून आंदोलन, उपोषण करत आहे. शासनाने सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, मराठा (Maratha) आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. विविध संस्थाचे गॅजेट स्विकारून सापडलेल्या नोंदी आधारे प्रमाणपत्र आणि आरक्षण द्यावे, यासाठी मी उपोषणाला बसलो आहे. माझ्या उपोषणात अडथळे आणण्यापेक्षा शासनाने मराठा आरक्षण मंजूर करावे.

Manoj Jarange
Sanjay Jadhav Meet Manoj Jarange : ठाकरेंच्या खासदाराने घेतली मनोज जरांगेंची भेट.. उपोषणाला पाठिंबा, आरक्षण लढ्यात सक्रिय राहण्याचा दिला शब्द...

राजकारण माझा धर्म नाही, मात्र मागण्या मंजूर नाही झाल्या तर सर्व धर्माच्या समाज बांधवांना सोबत घेऊन विधानसभेच्या 288 जागेवर उमेदवार उभे करणार असल्याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर अंतरवाली सराटी येथे ग्रामपंचायती मध्ये तातडीची बैठक सकाळी बोलावण्यात आली होती.यावेळी ठराव घेण्यात आला यात जरांगे यांच्या उपोषणाला सहा सदस्यांनी पाठींबा दिला.

अंबडचे प्रभारी तहसीलदार धनश्री भालचिम, पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, पोलीस सहाय्यक निरीक्षक आशिष खांडेकर,बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट दिली. त्याआधी शुक्रवारी रात्री परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडु जाधव यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. उपोषणाचा पहिलाच दिवस असून इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com