Sanjay Jadhav Meet Manoj Jarange : ठाकरेंच्या खासदाराने घेतली मनोज जरांगेंची भेट.. उपोषणाला पाठिंबा, आरक्षण लढ्यात सक्रिय राहण्याचा दिला शब्द...

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील यांच्याकडून जाधव यांचा खासदार झाल्याबद्दल सत्कार आणि अभिनंदन करण्यात आला. या भेटीत दोघांमध्ये बरीच चर्चा झाली.
Sanjay Jadhav Meet Manoj Jarange : ठाकरेंच्या खासदाराने घेतली मनोज जरांगेंची भेट.. उपोषणाला पाठिंबा, आरक्षण लढ्यात सक्रिय राहण्याचा दिला शब्द...

Chhatrapati Sambhajianagar : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात विशेषतः मराठवाड्यातील आठही मतदारसंघात मनोज जरांगे इफेक्ट दिसला. महायुती सरकारच्या विरोधात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून असलेली नाराजी छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील सातही मतदारसंघातील त्यांच्या मतांच्या रूपाने दिसून आली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), पंकजा मुंडे, प्रताप पाटील चिखलीकर, सुधाकर शृंगारे यांच्यासह हिंगोली, परभणीस धाराशिवमध्ये शिंदे गट, रासप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मराठा समाजाच्या रोषाचा फटका बसला. महाविकास आघाडीने सात जागा जिंकत महायुतीला दणका दिला. परभणीत संजय उर्फ बंडू जाधव, बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंगबाप्पा सोनवणे यांना मराठा समाजाची एकगठ्ठा मतं मिळाली आणि ते विजयी झाले.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विजयी गुलाल घेऊनच निकाल जाहीर झाला त्याच दिवशी म्हणजे चार जूनला रात्री उशीरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर 7 जून रोजी काल परभणीचे खासदार संजय जाधव यांनी रात्री साडेअकराच्या दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अंतरवालीत भेट घेत त्यांचे आभार मानले.

जरांगे पाटील यांच्याकडून जाधव यांचा खासदार झाल्याबद्दल सत्कार आणि अभिनंदन करण्यात आला. या भेटीत दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. संजय जाधव यांनी जाहीरपणे लोकसभा निवडणुकीत परभणीत मला आणि बीडमध्ये बजरंगबाप्पा सोनवणे यांना मराठा समाजाच्या एकजुटीचा फायदा झाल्याचे मान्य केले होते. तसेच लाखाच्यावर मताधिक्याने निवडून येण्याचा दावा निकालापुर्वीच केला होता.

Sanjay Jadhav Meet Manoj Jarange : ठाकरेंच्या खासदाराने घेतली मनोज जरांगेंची भेट.. उपोषणाला पाठिंबा, आरक्षण लढ्यात सक्रिय राहण्याचा दिला शब्द...
Manoj Jarange Patil : विधानसभेला नावे घेऊन पाडणार, जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा

हा त्यांचा दावा खरा ठरला आणि बीडमधून सोनवणे, परभणीतून स्वतः जाधव विजयी झाले. मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानण्यासाठी जाधव काल अंतरवालीत आले होते. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे भेट घेतली. परभणी लोकसभेतील आपल्या विजयानंतर ही आमची पहिलीच भेट! त्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. त्यांनी केलेला माझा सत्कार स्वीकारत त्यांना धन्यवाद दिले. त्यांच्याशी पुन्हा एकदा भेटून मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.

आजपासून मनोजदादाचे उपोषण सुरू होत आहे. ह्या उपोषण दरम्यान पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे व समाजासोबत असल्याचा विश्वास दिला. यादरम्यान सक्रियपणे समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी राहण्याचा शब्द, आपण जरांगे पाटील यांना दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

Sanjay Jadhav Meet Manoj Jarange : ठाकरेंच्या खासदाराने घेतली मनोज जरांगेंची भेट.. उपोषणाला पाठिंबा, आरक्षण लढ्यात सक्रिय राहण्याचा दिला शब्द...
Raosaheb Danve : रावसाहेबांचा 'अजब अंदाज', पराभवानंतर देखील ...

तत्पुर्वी महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थळ मातोश्री येथे भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले. आमदार राहुल पाटील यांच्यासमवेत याप्रसंगी हितगुज करताना उद्धवसाहेबांच्या (Uddhav Thackeray) परभणी येथील पावसातील सभेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांचे आभार व्यक्त केले आणि विजयाबद्दल त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्याचे जाधव यांनी सोशल मिडियावर सांगितले.

शरदचंद्रजी पवार साहेबांची सिल्वर ओक येथे भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. एवढे वय, आजारपण आणि विपरीत राजकीय परिस्थितीत आदरणीय पवार साहेबांनी दाखवलेले धैर्य आणि दिलेला लढा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील विविध बाबींवर इत्यंभूत चर्चा केली. त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे मनापासून आभार मानल्याचे जाधव यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com