Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे यांना रुग्णालयातून सुटी, अंतरवालीकडे रवाना..

Marathwada News : जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक अंतरवाली येथून 20 रोजी मुंबईकडे पायी दिंडी काढत रवाना होणार आहेत.
Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी आरपारच्या लढाईसाठी सज्ज झालेले मनोज जरांगे पाटील यांची आज रुग्णालयातून सुटी करण्यात आली. 24 डिसेंबरपासून जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. (Manoj Jarange Patil News) छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना अतंरवाली येथून थेट छत्रपती संभाजीनगरात आणण्यात आले होते.

Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil यांनी आंदोलकांना यादीच दिली, मुंबईच्या आंदोलनात 'या' गोष्टी सोबत ठेवा

आज डाॅक्टरांच्या परवानगीनंतर योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देत रुग्णालयातून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. (Maratha Reservation News) त्यानंतर लेगचच ते अंतरवाल सराटीकडे रवाना झाले आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयात पत्रकार परिषद घेत 20 जानेवारी रोजी मुंबईकडे निघणाऱ्या मराठा आंदोलकांच्या दिंडीसंदर्भात सविस्तर माहिती माध्यमांना दिली होती. (Jalna) त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास जरांगे पाटील हे रुग्णालयातून बाहेर पडले.

यावेळी त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अंतरवाली सराटीत दाखल होताच जरांगे पाटील आणि त्यांचे शिष्टमंडळ 20 जानेवारी रोजी मुंबईकडे जाण्यासाठीच्या तयारीला लागणार आहेत. (Marathwada) 24 डिसेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला होता. त्यांच्या मैदानावरील फटकेबाजीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर दुपारी मात्र छातीत दुखत असल्याची तक्रार जरांगे पाटील यांनी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच ते छत्रपती संभाजीनगर येथील `गॅलेक्सी`, या खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. चार दिवस उपचार घेतल्यानंतर ते आज पुन्हा अतरंवालीकडे निघाले आहेत. दरम्यान, रुग्णालयात त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी काल रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे गेले होते. या भेटीत झालेल्या चर्चेत जरांगे पाटील यांनी भुमरे यांच्या मार्फत सरकारकडे काही मागण्याही केल्या होत्या.

मराठवाड्यात कुणबी समाजाच्या कमी नोंदी सापडल्यामुळे शिंदे समितीला पुन्हा मराठावाड्यात पाठवा, मराठ आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, घरातील व्यक्तीला नोकरी संदर्भात निर्णय घ्या, आंदोलकांवरी गुन्हे मागे घ्या, 2017 मध्ये आरटीओ परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या द्या, आदी मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या होत्या.

Manoj Jarange Patil News
Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग ठरला; 'असं' असणार नियोजन

या संदर्भात सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्याची माहिती जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर मुंबईत 20 जानेवारीपासून सुरू करण्यात येणाऱ्या बेमुदत उपोषण आंदोलनाच्या तयारीला वेग येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक अंतरवाली सराटी येथून 20 रोजी मुंबईकडे पायी दिंडी काढत रवाना होणार आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Manoj Jarange Patil News
Maratha Reservation : मराठा आंदोलकांच्या रोषामुळे भाजपच्या 'या' आमदाराने गावातून काढता पाय घेतला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com