Manoj Jarange Patil collapse : जरांगे पाटील भोवळ येऊन कोसळले; वैद्यकीय पथकाकडून अपडेट समोर येईना... (Video)

Maratha Reservation March Manoj Jarange Patil Collapses During Nanded Meeting : नांदेड इथं मराठी समाजाची मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित बैठक झाली.
Manoj Jarange Patil collapse
Manoj Jarange Patil collapseSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil health update : मराठा आरक्षणासाठी मुंबई इथं काढण्यात येणाऱ्या मराठा आरक्षण मोर्चासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात बैठकांचा धडका लावला आहे. यातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवत आहे. आता मुंबईत गेलो, तर आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येत नसतो, असा इशारा मनोज जरांगे पाटील वारंवार देत आहे. यातच आता प्रकृती साथ देत नाही, असेही ते वारंवार सांगत आहेत.

यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या जवळचे आंदोलक कार्यकर्ते नेहमीच चिंता व्यक्त करत असतात. यातच नांदेड इथल्या बैठकीत, जरांगे पाटील भोवळ येऊन कोसळल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय पथक त्यांच्या उपचारासाठी पोचलं असलं, तरी त्यांच्याकडून त्यांच्या प्रकृतीविषयी अपडेट येत नसल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha) मुंबईत 29 ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी आणि त्याच्या निजोयनासाठी मनोज जरांगे पाटील स्वतः मैदानात उतरले आहे. महाराष्ट्रभर यासाठी बैठकी घेत आहेत. या बैठकांना देखील प्रतिसाद मिळत आहे. जरांगे पाटील आज सकाळपासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत. तिथं जरांगे पाटील यांच्या उपस्थित, सकाळपासून बैठक सुरू असतानाच, त्यांना भोवळ आली आहे.

या बैठकीसाठी नांदेड (Nanded) जिल्ह्यातून मराठा कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहावर मोठी गर्दी केली होती. बैठक सुरू असतानाच, मनोज जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटत होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असतानाच, त्यांचे बोलतानांचे शब्द अडखळत होते. यातून बसल्या जागेवर बोलणे थांबवले अन् अंग सोडून दिले. त्यानंतर बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला.

Manoj Jarange Patil collapse
Pankaja Munde Jalna : पंकजाताईंना बीडमध्ये काम करण्याची प्रबळ इच्छा..; अजितदादांकडून परवानगी मिळणार का?

मराठा कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधलं. वैद्यकीय पथकानं प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर जरांगे पाटील यांना शासकीय विश्रामगृहावर आराम करण्याचा सल्ला दिला. यानुसार जरांगे पाटील आराम करत होते. यानंतर पुढची वैद्यकीय अपडेट समोर आली नाही. पंरतु मराठा कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर झाली होती.

Manoj Jarange Patil collapse
Chhagan Bhujbal : भुजबळांनी धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची ऑफर नाकारली, मला जे करायचं ते नाशिकमध्ये..

दरम्यान, नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत चोरांनी हातसफाई केल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाभरातून आलेल्या मराठा बांधवांच्या पाकिटांवर चोरांनी हात फिरवला. चोरी करताना एक चोरटा मराठा बांधवांच्या लागला हाती लागल्याने, त्याला चांगलाच चोप दिला.

यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून चोराला ताब्यात घेतले. यानंतर बैठकीत अनेकांच्या खिशातील पाकिट आणि पैसे चोरल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. चोरांच्या या हात सफाईमुळे पोलिस देखील चक्रावले. हातसफाई करणाऱ्या चोरांच्या टोळीचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com