Pankaja Munde Jalna : पंकजाताईंना बीडमध्ये काम करण्याची प्रबळ इच्छा..; अजितदादांकडून परवानगी मिळणार का?

Pankaja Munde Expresses Desire to Work in Jalna Under Ajit Pawar Beed Ministry : जालना इथल्या भाजपच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Pankaja Munde Jalna
Pankaja Munde JalnaSarkarnama
Published on
Updated on

Beed Jalna politics : भाजप मंत्री पंकजा मुंडे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्या, तरी त्यांचे बीडवर असलेले प्रेम लपून राहत नाही. त्यांचे बीडवरील प्रेम वारंवार उफाळून येतं. असंच बीडवरील त्यांचं प्रेम, जालना इथं स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलताना समोर आलं.

"जालना जिल्हा राज्यात एक नंबर राहिल, असं काम करायचं आहे. माझ्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन खातं आहे. आमच्याकडे अजितदादा पालकमंत्री आहे. त्यांनी परवानगी दिली, तर बीडमध्ये देखील असेच काम करायचं आहे. तशी त्यांच्याशी चर्चा करणार आहे", असे मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, "जालन्यात खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न आहे. मी इथं आले, तेव्हा माझ्याकडे निधी नव्हता. तो वाटप झाला होता. यानंतर मी प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. पण, आता माझ्याकडे निधी आहे. त्यामुळे चांगलं काम करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि तसा आग्रह देखील असणार आहे".

'माझ्याकडे ग्रामविकास मंत्री, महिला आणि बालविकास मंत्री, जलसंधारण आणि रोजगार हमी, असे चार मंत्रालय माझ्याकडे होते. या काळात चांगले निर्णय घेतले. त्याचा फायदा आज देखील होत आहे. आता पर्यावरण आणि पशुसंवर्धन खातं आहे, इथं जालना एक नंबर राहिल, असे काम करायचं आहे', असा निर्धार पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवला.

Pankaja Munde Jalna
Top 10 News : GST रचनेत मोठे बदल होणार, कार्यकारी अभियंत्याच्या पैशाच्या मागणीला कंटाळला, 'तो' निर्णय अजित पवारांना न विचारता? वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

'आमच्या इकडे (बीड) पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आहेत, त्यांनी जर परवानगी दिली, त्यांच्याशी चर्चा करून बीडमध्ये तेच काम करेल, उलट जालनामध्ये जास्त काम करेल', असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

Pankaja Munde Jalna
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'ची प्रशंसा; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं दहशतवादाविरुद्ध लढ्यामागील यशाचं सूत्र!

निधी वाटप कसं होणार, यावर बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची सूचक, अशी कानटोचणी केली. 'ज्यांनी मतदान केलं त्यांनी निधी मागू नये, लोकांना वाटत आपण ताईंसोबत फोटो काढला सेल्फी काढला, मी मतदान केलं आम्हाला निधी द्या. पण तसं होणार नाही. मतदानाला निधी देता येत नाही, कामाला निधी देता येतो. व्यक्तीला निधी देणं आणि कामाला निधी देणे याच्यात फरक आहे, याकडे लक्ष वेधताना कामासाठीच निधी दिला जाईल', असे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

चांगलं काम करण्याची मानसिकता आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना खूप चांगल्या संकल्पना मांडल्या आहेत. आमदारांनी चांगल्या कल्पना सांगितल्या. चांगल्या कल्पनांचं स्वागत करू. त्यावर काम देखील करू. इतर गोष्टींच्या पाठीशी उभं राहत नाही. तसं राहतच नाही. म्हणून आपण त्या पद्धतीने काम करूया जसं माझ आतापर्यंत रेकॉर्ड आहेत. चांगल्यापद्धतीनं काम करण्याचं रेकाॅर्ड असल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पालकमंत्री जिथला असतो, तिथंली माणसं त्या जिल्ह्यामध्ये काम करायला जाऊ शकतात. पण मी रोख लावलाय, कुणी बाहेरच्यानं इकडे यायचं नाही, असेही स्पष्टपणे पंकजा मुंडे यांनी सांगितले. पोलिसांच्यावतीने शहरांमध्ये विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. त्याचं उद्घाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com