Raj Thackeray News : 'मी आहे, काळजी करू नका..'; उपोषणकर्ते मनोज जरांगेंना राज ठाकरेंचा फोन

Maratha Reservation : मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी जरांडे यांची उपोषणस्थळी भेट घेतली.
manoj jarange, Raj Thackeray
manoj jarange, Raj ThackeraySarkarnama

Jalna Protest News : सातव्या दिवशीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावातील उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी आज (रविवार) उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. "मी आहे, काळजी करू नका,"असे आश्वासन ठाकरेंनी जरांडेंना दिले. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार, स्वराज्यप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी काल (शनिवारी) जरांडेंची भेट घेऊन संवाद साधला होता. आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी जरांडे यांची उपोषणस्थळी भेट घेतली. राज ठाकरेंनी यावेळी जराडेंशी फोनवरुन संवाद साधला. राज ठाकरे यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. तुम्ही काळजी करू नका, मनसे सदैव आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

manoj jarange, Raj Thackeray
Raj Thackeray On Jalna Maratha Protest : "जालन्यात काल काय असं घडणार होतं ?" |

राज ठाकरेंनी नेमकं काय घडलं? याचीही माहिती घेतली. जरांगे पाटील यांनी सर्व माहिती देतानाच आम्हाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारल्याचं सांगितलं. "आम्ही अन्याय सहन करणार नाही. आता तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा, असे जरांगे पाटील म्हणाले. "तुम्ही काळजी करू नका. या आंदोलनात तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्यासोबत आहोत. मनसे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.

manoj jarange, Raj Thackeray
Jalna Protest News : एसटी गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या ५२ जणांवर गुन्हा दाखल ; सातव्या दिवशी उपोषणकर्ते मागणीवर ठाम..

काल (शनिवारी) राज ठाकरे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? असा सवाल शिंदे-फडणवीस-पवार सरकारला विचारला होता.

"जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे," असे टि्वट राज ठाकरे यांनी केले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com