Video Manoj Jarange: आता अंतरवाली सराटीत नव्हे, तर 'या' ठिकाणी होणार उपोषण; मनोज जरांगे यांनी ठिकाण बदललं

Antarwali Sarati Maratha Reservation Protest Kunbi Certificate News Update:मराठा आरक्षण आंदोलनाला समाज बांधवांनी साथ दिली, अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांनी प्रतिसाद आणि पाठिंबा दिला. पण या आंदोलनामुळे गावाला जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
Manoj Jarange, Shabhuraj Desai, Sandepan Bhumre
Manoj Jarange, Shabhuraj Desai, Sandepan BhumreSarkarnama
Published on
Updated on

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या पुढील उपोषणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे."आता उपोषण करण्याची वेळ आली तर थेट डोंगरावर उपोषण करणार कोणालाही त्रास होणार नाही. सात-आठ किलोमीटर गावापासून दूर असलेला डोंगर उपोषणासाठी निवडणार," असे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सांगितले.

अंतरावली सराटी हे गाव खूप चांगलं आहे,परंतु आंदोलनामुळे (maratha reservation) गावाला आणि गावकऱ्यांना त्रास होतो, तेथे आता उपोषण करणार नसल्याची माहिती खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी दिली. काल (शुक्रवार) जरांगे यांनी सहाव्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले. "सरकारचा सन्मान म्हणून एका महिन्याचा वेळ दिला आहे. कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण देऊ असे शंभुराज देसाई म्हणाले, त्यामुळे एक महिना सरकारला वेळ दिला," असे ते म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलनाला समाज बांधवांनी साथ दिली, अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांनी प्रतिसाद आणि पाठिंबा दिला. पण या आंदोलनामुळे गावाला जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात मनोज जरांगे पाटलांनी काल उपोषण स्थगित करताना भावना व्यक्त केल्या.

Manoj Jarange, Shabhuraj Desai, Sandepan Bhumre
Video Manoj Jarange: जरांगे, तुम्ही रडू नका, तुमची आम्हाला गरज आहे, मित्र म्हणून माझे ऐका!

शिंदे समितीसोबत आमच्या शिष्टमंडळाची बैठक होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. ते कामाला लागले आहेत. मुंबईत मोठ्या घडामोडी होणार आहेत. सगेसोगऱ्यांसह आरक्षण मिळाले नाही, तर विधानसभा निवडणुकीत अन्य समाजाचे लोक एकत्र येऊन निवडणुकीच्या मैदानात उतरु,असा सांगत मंत्र्यांनो,दगा फटका करु नका,असा इशारा त्यांनी दिला. मंत्र्यांना म्हणालो दगे फटाके देऊ नका, रस्त्यावर उतरवू नका. तुम्ही नाही दिलं तर विधानसभेला 4-5 समुदायाचे लोक एकत्र मैदानात उतरणार आहे, असे ते म्हणाले.

माझ्या नावावर 100 कोटी रुपये उकळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास व्यक्त करीत उपोषण स्थगित केले. 13 जुलै रोजी सरकार या विश्वासाला किती पात्र ठरते हे स्पष्ट होणार आहे. अंतरवालीतूनच त्यांच्या उपोषणाला विरोध झाला. याची सल त्यांच्या मनात होती.उपोषण स्थगित करताना जरांगे पाटील यांनी ती बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com