Loksabha Election 2024 : नांदेडची जागा काँग्रेसला, पण उमेदवार कोण?

Congress Politics : काँग्रेसने अशोक चव्हाणांवर भिस्त ठेवली तेच भाजपमध्ये गेले. त्यामुळे काँग्रेसमधील उमेदवाराला संधी मिळणार की आयात नेत्याला काँग्रेस उमेदवारी मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News :

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जागावाटपांवर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येते. यात नांदेडच्या जागेबाबतही फैसला झाला. नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसला सोडल्याची निश्चित मानले जाते. त्यामुळे आता नांदेडमधून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, यावर चर्चा सुरू झाली आहे. काही नावे चर्चेत असली तरी ऐनवेळी आयात उमेदवाराला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Tanaji Sawant : महाराष्ट्रात महायुती 48 विरुद्ध 0 आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा दावा

महाविकास आघाडीच्या (MVA) जागावाटपाची अंतिम बैठक मुंबईत दोन दिवसांपूर्वी झाली. ज्या जागेबाबत जास्त ओढाताण नाही, त्या जागेत नांदेड लोकसभा मतदारसंघाचा (Nanded Loksabha Constituency) समावेश होतो. ही जागा काँग्रेसला (Congress) सोडण्यात येणार असल्याचे निश्चित मानले जाते. नांदेडला आलेल्या पक्षनिरीक्षकांनी ही जागा काँग्रेसला शंभर टक्के सुटेल, असा दावा केला आहे. त्यामुळे या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जवळ आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल, हे सांगणे कठीण झाले आहे .

अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी अद्याप फारसे यश आले नाही. अशा परिस्थितीत कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, हा चर्चेचा विषय झाला आहे.

नांदेड तसा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या‌ मतदारसंघाचा निवडणुकीचा इतिहास पाहता चार वेळा काँग्रेस वगळता अन्य पक्षांचे उमेदवार निवडून आले आहेत. तसेच काँग्रेस वगळता निवडून आलेल्या पक्षाला विजयाची पुनरावृत्ती करता‌ आली नाही, हेही विशेष. 2019 मध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर निवडून आले. भाजप विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी सर्व हातखंडे वापरत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला. जिल्ह्याच्या राजकारणात चव्हाण कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे दुसरे पर्यायी नेतृत्व तयार झाले नाही. त्यामुळेच लोकसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नांदेडला आलेल्या पक्षनिरीक्षकांनी आमच्याकडे चार सक्षम उमेदवार आहेत, असा दावा केला होता. त्याचवेळी उमेदवारांची नावे सांगणे टाळले.

नांदेडची जागा पुन्हा जिंकण्यासाठी काँग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. या जागेसाठी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. तसेच भाजपमधील ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बीआरएसमध्ये गेलेले प्रा. डॉ. यशपाल भिंगे हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Latur BJP News : बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशाने, निलंगेकरांना गुदगुल्या..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com