Nanded Political News : राजकीय नेते अजूनही घेताहेत मराठा आंदोलकांचा धसका...

Maratha Reservation News : अशोक चव्हाणांना आपल्याच कारखान्यात मात्र लपून-छपून जावे लागले.
Nanded Political News
Nanded Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan News : (लक्ष्मीकांत मुळे) मराठा आरक्षणासाठी राज्यात विशेषतः मराठवाड्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा राजकीय नेत्यांना चांगलाच फटका बसला. विशेषतः दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनात तर सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्र्यांना पाचशेहून अधिक गावांमध्ये बंदी करण्यात आली होती. (Maratha Reservation) या शिवाय दिसेल तिथे ताफा अडवणे, राजीनाम्याची मागणी करणे, काळे झेंडे दाखवणे, मराठा आरक्षणासाठी काय केले? याचा जाब विचारला जात असल्याने नेते हैराण झाले होते.

Nanded Political News
Nanded Political News : नांदेड-हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबन थोरातच ; मातोश्रीकडून बळ मिळाले...

अनेकांनी तर आंदोलकांच्या दबावाला बळी पडत आमदारकीचे, खासदारकीचे राजीनामेही दिले. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी दोन महिने वेळ वाढवून देत उपोषण स्थगित केले. (Nanded) त्यामुळे राजकीय नेत्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Marathwada) परंतु अजूनही काही भागात साखळी उपोषण सुरू असल्याने राजकीय नेते उघडपणे बाहेर पडायला धजावत नाहीत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांच्याबाबतीत असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमातच मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली होती. त्याआधी नांदेड जिल्ह्यातच त्यांना आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्याचा सामना करावा लागला होता.

त्यामुळे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेले अशोक चव्हाण शनिवारी (ता.४) एका बैठकीसाठी कारखान्यात आले खरे, पण त्याची माहिती संचालकांनाही नव्हती. अत्यंत गुप्तपणे अशोक चव्हाण आपल्या मोजक्या समर्थकांसह कारखान्याच्या आढावा बैठकीला आले. चार तास त्यांनी आढावा घेतला आणि तिथून निघूनही गेले. एरवी जातील तिथे आपला लवाजमा घेऊन जाण्याची सवय असलेल्या अशोक चव्हाणांना आपल्याच कारखान्यात मात्र लपून-छपून जावे लागले.

मराठा आंदोलकांचा धसका अजूनही राजकीय नेत्यांना आहे, हेच यावरून दिसून आले. साहेब कारखान्यावर आले कुणी नाही पाहिले, अशी चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात होत आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अशोक चव्हाण हे संस्थापक अध्यक्ष आहेत. या कारखान्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून, राज्य सरकारने कर्जाला हमी दिल्याने दीडशे कोटी कर्ज मंजूर झाले आहे. या कारखान्याची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी चव्हाण स्वतः लक्ष घालून निर्णय घेत आहेत. या कारखान्यावर ते शनिवारी सकाळी काही मोजक्या कार्यकर्त्यांसह आले होते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com