OBC Reservation : सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, भुजबळांची प्रतिक्रिया; वडेट्टीवारांचं समर्थन

Chhagan Bhujbal On Bbc Reservation : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आवाज उठवण्याची छगन भुजबळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यावरून वादाला तोंड फुटलं आहे....
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Issue In Maharashtra : मराठा आरक्षणावरून राज्यातलं राजकारण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आता यावरून ओबीसी समाजातील नाराजी आणि रोष वाढत चालला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाज उठवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांना आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही पाठिंबा दिला आहे.

Chhagan Bhujbal
Harshvardhan Jadhav News : हर्षवर्धन जाधव पुन्हा बोलले, मराठा आरक्षण म्हणजे बिरबलाची न शिजणारी खिचडी...

काय म्हणाले छगन भुजबळ?

छगन भुजबळांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आता या ऑडिओ क्लिपवर भुजबळांची प्रतिक्रिया आली आहे. राज्यात ओबीसी आरक्षणावर आक्रमण होत आहे. बऱ्याच आमदारांची घरं पेटवली जाताहेत. ओबीसी कार्यकर्त्यांचं हॉटेलही पेटवलं जात आहे. त्यामुळे या घटनांवर कोणीतरी बोललं पाहिजे. फक्त एका व्यक्तीने नाही तर सर्वांनी एकत्र येऊन एका आवाजात बोललं पाहिजे. हा आपल्या बोलण्याचा अर्थ आहे, असं भुजबळ म्हणाले.

काय म्हणाले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार?

छगन भुजबळांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. ओबीसीमध्ये ३७२ जाती आहेत. याती ५० ते ६० टक्के जातींना एक बिगा जमीनही नाही. बळी तो कान पिळी... म्हणजे जो मोठा असतो तो घेऊन जातो. यामध्ये सामान्य माणूस उद्ध्वस्त होऊ नये, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. हेच भुजबळांच्या म्हणण्यातून दिसत असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले.

प्लॅन ए काय किंवा बप्लॅन बी काय? हा मनोज जरांगे पाटील यांचा विषय आहे. मराठा समाजाने संयमाने गरीब ओबीसी समाजाच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत. अजूनही ओबीसी समाज हा अर्धपोटी झोपतो. ओबीसीत राहून त्यांची स्थिती सुधारली नाही. आधीक इतक्या मोठ्या संख्येने जाती आहेत. त्यात पुन्हा नवीन जातीचा समावेश. त्यातून कुणाच्या वाट्याला काय मिळेल? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या वेदना समजतायेत. ग्रामीण भागातील गरीब ओबीसींच्या वेदना त्यांनी समजाव्यात, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

भुजबळांच्या व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय?

काही नाही ती सगळी मंडळी आलेली आहे... आणि त्यांचं म्हणणं आहे, की आपण आवाज उठवायला पाहिजे. मी एकटा कुठपर्यंत लढणार.. तालुका तालुक्यात, गावागावांत जे काय बुलडोझर चालले आहेत त्यांचे... त्यात ओबीसी काही वाचणार नाहीत आता. त्यामुळे आता करेंगे या मरेंगे... सर्वांनी आता आवाज द्यायला पाहिजे... असंही मरतोय तसंही मरतोय. आता मी उभा राहतोय, असं छगन भुजबळ म्हणत असल्याचं ऐकायला येत आहे. पण ही व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप नक्की त्यांचीच आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil News : ‘चेहऱ्यावर हसू येतं, तेव्हा वाटतं आता बरं वाटतंय; पण पुन्हा तब्येत बिघडते...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com