Maratha Reservation : धाराशिवच्या तरुणाला मिळालं पहिलं कुणबी प्रमाणपत्र; जिल्ह्यातील संचारबंदीवरही मोठा निर्णय

Kunbi Maratha Caste Certificate Dharashiv District Collector : पुराव्यांच्या आधारे मराठ्यांना कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे.....
dharashiv news
dharashiv newsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Latest News : जुन्या नोंदींवरून मराठा समाजाला आजपासून कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येत आहे. धाराशिव जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओम्बासे यांनी मराठा समाजाला पहिल्या मराठा-कुणबी प्रमाणपत्रं दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येत आहे.

dharashiv news
Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीतून मोठी अपडेट; मुख्यमंत्री शिंदेंनी मांडली राज्य सरकारची भूमिका, म्हणाले...

न्या. शिंदे समितीच्या अहवालानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला आणि आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू केलं आहे. सरकारच्या निर्णयानंतर धाराशिव जिल्ह्यातलं पहिलं मराठा कुणबी प्रमाणपत्र हे सुमिन माने या तरुणाला देण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये न्या. शिंदे समितीच्या तपासणीत ४५९ कुणबी नोंदी आढळून आल्या. त्या पुराव्यांच्या आधारे पहिलं कुणबी प्रमाणपत्र आम्ही आज दिलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी दिली.

राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार आमच्याकडे असलेले महसूल विभागाचे जे कागदपत्र आहेत, त्यातील काही गावांचे कागदपत्र आम्ही जिल्ह्याच्या वेबसाइटवर उपलब्ध केले आहेत. आज आणि उद्या इतर जे विभाग आहेत, प्रामुख्याने शिक्षण आणि भूमिअभिलेख विभागाचेही कागदपत्र स्कॅन करून पीडीएफ फाइल वेबसाइटवर अपलोड करतोय. यानुसार जे सर्व लाभार्थी असतील त्यांनी या पुराव्यांचा अभ्यास करावा आणि वंशावळीचे जे कागदपत्र असतात आपले आजोबा आणि पंजोबांचे कागदपत्र सादर करून लाभर्थ्याने ऑनलाइन प्रमाणपत्र घ्यावं. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. त्यासाठी आमची टीम पूर्ण सहकार्य करेल, असं जिल्हाधिकारी ओम्बासे म्हणाले.

आपल्याला प्रमाणपत्र मिळालं याचं समाधान आहे. पण मराठ्यांना सरसकट मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं. आणि तसं झालं नाही तर मी हे प्रमाणपत्र सरकारला परत करेन, असं सुमिन माने या तरुणाने म्हटलं आहे.

धाराशिवमधील संचारबंदी मागे

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी धरणे आंदोलनं, रास्ता रोको आणि उपोषण करण्यात आले. यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ५ पासून संचारबंदी हटवण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

dharashiv news
Ashok Chavan On Maratha Reservation : सर्वपक्षीयांच्या बैठकीत मराठा आरक्षणावर अशोक चव्हाणांनी सुचवला फॉर्म्युला !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com