Marathwada Political News : अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. (Maratha Reservation) यात अनेक आंदोलकांची डोकी फुटली, रक्त सांडले. महिलांवरही लाठ्या चालवल्या गेल्या, यातून मग पोलिसांवरही दगडफेक झाली. या घटनेचे राज्यभार पडसाद उमटत असतांना एका तरुणाने आपला राग वेगळ्याच पद्धतीने व्यक्त केला आणि त्याची राज्यभरात चर्चा झाली.
गेवराई पायगाचे सरपंच असलेल्या मंगेश साबळे या तरुणाने आपली दहा लाखाची नवी कोरी कार अंतरवाली सराटी घटनेचा निषेध म्हणून भर रस्त्यात पेट्रोला टाकून जाळली. (Aurangabad) या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि मंगेश साबळे प्रकाश झोतात आला. कार जाळल्याचा आपल्या जराही पश्चाताप नाही. (Marathwada) माझ्या कारपेक्षा आई-बहिणींचे रक्त महत्वाचे असल्याचे साबळे याने म्हटले आहे.
फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा येथे सरपंच मंगेश साबळे यांनी आपली नवी कार पेटवून निषेध व्यक्त केला. एवठा राग अनावर का झाला ? हे सागंताना सरपंच साबळे चांगले संतापले होते. (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात शांततेत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आमच्या आई बहिणींना रक्तबंबाळ केले. आमच्या आई- बहिणींच्या रक्ताची तुलना माझ्या वाहनाशी होऊच शकत नाही.
यापूर्वी देखील आमच्या पूर्वजांनी या मातीसाठी बलिदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अख्ख आयुष्य स्वराज्यासाठी अर्पण केलं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनीही मोठे योगदान दिले. मातीच्या रक्षणासाठी, येथील माणसासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे रक्त आमच्या अंगात सळसळते आहे. शांततेत सुरू असलेल्या या आंदोलकांवर पोलिसांनी कुणाच्या इशाऱ्यावर लाठीचार्ज केला ? याचा हिशोब मिळणे गरजेचे आहे.
पाण्यासारखे रक्त या मातीला आमच्या पूर्वजांनी दिले, म्हणून आज आम्ही जगतो आहोत. आंदोलनाच्या ठिकाणी आमच्या आई-बहिणींवर लाठ्या चालवून त्यांना रक्तबंबाळ केले तर आम्ही गप्प कसे बसणार ? रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब या सरकारला द्यावा लागेल, अशा शब्दात सरपंच मंगेश साबळे यांनी सरकारचा निषेध केला. मंगेश साबळे यांनी सुरुवातीला वडिलांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळावे यासाठी टावरवर चढत आंदोलन केले होते.
त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पाण्याच्या टाकीवर चढूनही साबळे यांनी आंदोलन करत लक्ष वेधले होते. सावंगी परिसरात मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी यापुर्वी केला होता. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या नवीन प्रवेशद्वारावर अर्धनग्न होऊन आंदोलन केले होते.
विद्युत रोहित्र मिळत नसल्याने अंधारात गेलेल्या गावाला उजेडात आणण्यासाठी अर्ध नग्न होऊन परिणामकारक आंदोलन यामुळे साबळे यांची जिल्हाभरात चर्चा होती. चार महिन्यापूर्वी पंचायत समितीत सर्वसामान्यांची कामे होत नसल्याने गटविकास अधिकाऱ्याकडून पैशाची मागणी होत असल्याचा आरोप साबळे यांनी केला होता. आरोप करून ते थांबले नाही, तर दोन लाख रुपये पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात त्यांनी उधळले होते.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.