Maratha Reservation : बीडमध्ये अचानक रास्ता रोको अन् महामंडळाची बसही जाळली!

Beed News : अर्धा तासांहून अधिक रास्ता रोकोमुळे दुरवर वाहनांच्या रांगा लागल्या.
 Maratha Reservation : बीडमध्ये अचानक रास्ता रोको अन् महामंडळाची बसही जाळली!
Published on
Updated on

Maratha agitation news : मराठा आरक्षण मागणीसाठी बीड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून साखळी उपोषणे, कँडल मार्च अशी आंदोलने सुरु असताना शनिवारी रात्री अचानक धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस पेटवून देण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Maratha Reservation : बीडमध्ये अचानक रास्ता रोको अन् महामंडळाची बसही जाळली!
Maratha Reservation : हजार उंबरे, ५ हजार लोकसंख्येच्या गावात चूल पेटली नाही, अख्खे गाव उपाशी

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरु केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणी आणि मोठ्या गावांमध्ये साखळी उपोषणे सुरु आहेत. महिलांकडून कँडल मार्च काढले जात आहेत.

दरम्यान, शनिवारी न्यायमुर्ती (निवृत्त) संदीप शिंदे समितीने जिल्हा दौरा केला. जिल्हास्तरावर मराठा - कुणबी नोंदीबाबत आढावा घेतल्यानंतर समितीने समाज बांधवांकडून पुरावे आणि निवेदने स्वीकारली.

समितीच्या आगमनापूर्वीच अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथे शत्रुघ्न काशिद या व्यक्तीने पाण्याच्या टाकीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. आरक्षण मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी कुटूंबियांनी भूमिका घेतल्यानंतर समाज बांधवांनी मृतदेह अंबाजोगाईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठेवून ठिय्या आंदोलन सुरु केले.

 Maratha Reservation : बीडमध्ये अचानक रास्ता रोको अन् महामंडळाची बसही जाळली!
Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी सत्तार समर्थक संचालकाचा राजीनामा..

दरम्यान, तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. उशिरापर्यंत अंत्यसंस्कार झाले नाहीत. दरम्यान, शनिवारी रात्री आंदोलकांनी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.

अर्धा तासांहून अधिक रास्ता रोकोमुळे दुरवर वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान, यानंतर याच महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बसस पेटवून देण्यात आली. बीडहून कोल्हापूरकडे जाणारी दुमजली बसला आहेर वडगाव फाटा येथे आग लावण्यात आली. यात बस जळून खाक झाली.

(Edited By - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com