Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी सत्तार समर्थक संचालकाचा राजीनामा..

Shivsena News : राजकीय नेत्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama

Marathwada Political News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत, बाजार समिती व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. याचा फटका सगळ्याच राजकीय पक्षांना बसतो आहे. (Maratha Reservation) विशेषतः सत्ताधारी भाजप व शिंदे गटात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून असंतोषाचे वातावरण आहे.

Maratha Reservation News
High Court News : राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा सुरेखा लहाने यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द..

राज्याचे अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर बलांडे यांनी राजीनामा दिला आहे. (Abdul Sattar) भाजपच्या आमदारांकडून मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवली जात असतांना आता शिंदे गटातूनही राजीनामास्त्रांचा वापर केला जात आहे.

किशोर बलांडे यांच्या संचालक पदाच्या राजीनाम्याने अब्दुल सत्तार यांची चिंता वाढणार आहे. (Shivsena) फुलंब्री तालुक्यात काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी सरकारवर नाराजी व्यक्त करून राजीनामे देत आहेत. (Marathwada) दरम्यान फुलंब्री तालुक्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषणही आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या साखळी उपोषणात सहभाग घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाने सरकारला दिलेली तीस दिवसांची मुदत संपल्यानंतर आता मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा पेटला आहे. सरकारने शब्द न पाळल्यामुळे या सरकारचा निषेध व्यक्त करून कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्रीच्या संचालक पदाचा किशोर बलांडे यांनी राजीनामा दिला.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून बलांडे यांना अब्दुल सत्तार यांनी बळ दिले आहे. पण विधानसभेची निवडणूक वर्षभरावर असतांनाच बलांडे यांनी राजीनामा दिल्यामुळे मंत्री सत्तार यांना धक्का बसला आहे. मराठा समाज एकवटला असून सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारीही आता `पक्ष गेले चुलीत, आधी आरक्षण मगच पक्ष`, अशी भूमिका घेत राजीनामे देणे सुरू केले आहे. सत्तार समर्थक किशोर बलांडे यांनी समाजाच्या भावना आणि मराठा क्रांती मोर्चाने केलेले आवाहन लक्षात घेऊन राजीनामा दिला. तसेच भाजपचे रोषण अवसरमल यांनीही बाजार समितीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. शिवसेना शिंदे गटाचे युवासेना तालुका प्रमुख भारत भूमे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com