Maratha Reservation News : जरांगे भुजबळांवर एकेरी भाषेत टीका करतात, तेव्हा संभाजीराजे गप्प का ?

Maharashtra News : संभाजीराजे छत्रपती हे एका विशिष्ट जातीचे, धर्माचे कसे काय होऊ शकतात ?
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : छगन भुजबळ ओबीसींसाठी लढा देत आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी कशासाठी केली जात आहे. संभाजीराजे छत्रपतींचा आम्ही सन्मान करतो, पण मनोज जरांगे पाटील भुजबळांवर जेव्हा एकेरी भाषेत टीका करतात, तेव्हा संभाजीराजे गप्प का बसतात? असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. (Maratha Reservation News) हिंगोली येथे येत्या २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या एल्गार मेळाव्याच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.

Maratha Reservation News
MP Imtiaz Jaleel News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात फूट पाडू पाहणाऱ्या नेत्यांना आवरा...

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ओबीसींचा महाएल्गार मेळावा यशस्वी झाला. (OBC) याच मेळाव्यात जिल्हा, तालुका आणि गावागावांत एल्गार मेळावे घेण्याचे आवाहन ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणातून केले होते. या मेळाव्यांना शक्य तिथे मी आणि इतर ठिकाणी ओबीसी नेते येतील, असेही भुजबळांनी (Chhagan Bhujbal) स्पष्ट केले होते. त्यानंतर आता ओबीसींचा दुसरा एल्गार मेळावा येत्या २६ नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे होणार आहे.

या मेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक आज छत्रपती संभाजीनगरात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या उपस्थितीत पार पडली. (Maharashtra) शेंडगे यांनी या वेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही आपले मत मांडले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण ते मराठा आरक्षणातून न देता स्वतंत्र द्यावे, याचा पुनरुच्चार शेंडगे यांनी केला.

कालच्या सभेनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळसाहेबांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. का द्यावा त्यांनी राजीनामा ? जे भुजबळ आयुष्यभर ओबीसींकरिता लढा देत आहेत आणि आजही लढत आहेत त्यांनी का राजीनामा द्यावा ? संभाजीराजे छत्रपती हे राजघराण्यातील वारसदार आहेत आणि त्यांना आम्ही मानतो. परंतु संभाजीराजे छत्रपतींनी मनोज जरांगे जेव्हा भुजबळसाहेबांवर एकेरी भाषेत टीका करतात, धमक्या देतात तेव्हा त्यांच्याबद्दल का बोलत नाहीत? छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन राज्य निर्माण केले होते.

संभाजीराजे छत्रपती हे एका विशिष्ट जातीचे, धर्माचे कसे काय होऊ शकतात ? ओबीसींना हे आरक्षण काय सहज मिळाले आहे का ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, घटनेने दिलेले हे आरक्षण आहे. अजूनही ते पूर्णपणे मिळालेलं नाही आणि म्हणूनच ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, अशी आमची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. जनगणना केल्यानंतरच समजेल कोणाची संख्या जास्त आहे, असेही शेंडगे म्हणाले. येत्या २६ नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील एल्गार मेळाव्यास मोठ्या संख्येने आपल्या लेकराबाळासह उपस्थित राहून आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही शेंडगे यांनी बैठकीत केले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com