Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक; महाराष्ट्र दिनापासून घेणार 'हा' निर्णय

State Government : सरकार पुन्हा न्यायालयात जाणार
Sakal Maratha Samaj Meeting
Sakal Maratha Samaj MeetingSarkarnama
Published on
Updated on

Sakal Maratha Samaj : मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयात बदल करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका फेटाळली आहे. आता राज्य सरकारने पुन्हा क्यूरेटिव्ह पिटीशन दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Sakal Maratha Samaj Meeting
Maval Bazar Committee : एका रुपयाचीही उलाढाल नसलेल्या मावळ बाजार समितीत मोठी चुरस; 'हे' आहे कारण

मराठा समाजाला आरक्षण (Martha Reservation) देण्याची मागणी करीत ९ ऑगस्ट २०१६ पासून राज्यभर मूक मोर्चे निघाले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता न्यायालयाने राज्य सरकारची (State Government) फेरविचार याचिका फेटाळल्याने समाजाला आरक्षण मिळण्याबाबत सरकार इतर कायदेशीर बाबींचा विचार करीत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे सकल मराठा समाजातील बैठक पार पडली. त्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

Sakal Maratha Samaj Meeting
Pune Politics : गावकारभाराची जबाबदारी बहीण-भावावर; बहीण सरपंच तर भाऊ उपसरपंच

या बैठकीत आरक्षणाबाबत चर्चा झाली. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण टिकवणे शक्य नसल्याने आता ओबीसीतून (OBC) आरक्षण मागण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrpati Sambhajinagar) क्रांती चौकात बेमुदत ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

Sakal Maratha Samaj Meeting
Vishal Phate Fraud Case in Pune : बार्शीच्या विशाल फटेची आठवण करून देणारा राठोड अद्याप सापडला नाही

सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेतलेले निर्णय

कोर्टात कुणाला जायचे ते जाऊद्या. ओबीसीत समावेश करण्यासाठी क्रांती चौकात बेमुदत आंदोलन करण्यात येईल. आम्ही सरकारकडे जाणार नाही. सरकारने तिथेच चर्चेला यावे. जे तिकडे चर्चेला जातील, त्यांनी इथे येऊ नये. पैसे स्वतःच्या खिशातील घालायचे. एक मे पासून आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार. मराठा क्रांती मोर्चा नव्हे तर, सकळ मराठा समाजाच्यावतीने आंदोलनाला बसणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com