Vishal Phate Fraud Case in Pune : बार्शीच्या विशाल फटेची आठवण करून देणारा राठोड अद्याप सापडला नाही

Pune Scam News : या प्रकरणात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल, आणखी लोक पुढे येण्याची शक्यता
Avinash Rathod and Vishakha Rathod, Vishal Phate
Avinash Rathod and Vishakha Rathod, Vishal PhateSarkarnama

Scam of Seven Hundreds Crores : पुण्यात सध्या शेकडो लोकांना गुंतवणुकीच्या नावाखाली शेकडो कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनुसार चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश अर्जुन राठोडसह त्याची पत्नी विशाखा अविनाश राठोड सध्या फरार आहेत. पुण्यातील बाणेर रस्त्यावरील एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून राठोड याने गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे.

Avinash Rathod and Vishakha Rathod, Vishal Phate
Vishal Phate Fraud Case in Pune : पुण्यात विशाल फटेचा नवा अवतार; १६ कोटींच्या फसवणूकप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल !

आरोपी अविनाश राठोड (Avinash Rathod) याने गुंतवणूकदारांना दर महिन्याला मूळ रक्कमेतील पाच टक्के व पाच टक्के व्याज असा मिळून दरमहा दहा टक्के परतावा, तसेच २० महिन्यात दामदुप्पट देण्याचे आमिष दाखविले.

ही कंपनी पुण्यात २०११ पासून काम करीत आहे. दरम्यान, त्याने लोकांना काही प्रमाणात परतावेही दिले. त्यामुळे विश्वास संपादन झाल्याने गेल्या ११ महिन्यात या कंपनीच्या माध्यमातून पुण्यासह राज्यातील अनेकांनी गुंतवणूक केल्याची माहिती आहे. या काळात जमा झालेली कोट्यवधींची रक्कम घेऊन आता राठोड फरार झाला आहे.

हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी घोटाळ्याशी मिळतेजुळते असल्याचे दिसून येत आहे. राठोड याने शेअरमार्केमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने केलेली फसवणुकीमुळे बार्शीतील विशाल फटेची (Vishal Phate) आठवण होत आहे.

Avinash Rathod and Vishakha Rathod, Vishal Phate
Pune Fraud News : पुण्यात विशाल फटेचा नवा अवतार; गुंतवणूकदारांची सातशे कोटींची फसवणूक, गुन्हा दाखल !

काय होते विशाल फटे प्रकरण ?

शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करा, त्यातून मोठा परतावा देण्याचे आमिष विशाल फटेने गुंतवणुकादारांना दिले. त्याला भुलून बार्शीसह संपूर्ण राज्यातील सुमारे १४० नागरिकांनी गुंतवणूक केली. दरम्यान, त्याने खास ४० लोकांसाठी विशेष योजना आणली होती. त्यात त्याने सहा हजार कोटींचा परतावा देण्याचा दावा केला होता.

त्यानुसार अनेकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. फटेने सुरुवातीस गुंतवणूकदारांनी परतावे दिले. त्यानंतर आताच फायदा झालेली रक्कम काढू नका, आणखी फायदा होणार आहे असे फटे लोकांना सांगू लागला. मात्र जशी गुंतवणूक वाढली तसे त्याने परतावे देणे कमी केले. दरम्यान, काहींना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले.

Avinash Rathod and Vishakha Rathod, Vishal Phate
Sarkarnama Special : दामदुप्पट रकमेच्या अमिषाने कोट्यवधींचा घोटाळा? पुण्यात ‘विशाल फटे’सारखे प्रकरण; गुंतवणूकदार हवालदिल

९०० लोकांना गंडा

लोकांचे पैसे देता येत नसल्याने विशाल फटे काही काळ फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी (Barshi) त्याच्या पत्नीसह आई-वडील, भाऊ यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक केली. विशाल फटेंच्या खात्यावरून सुमारे १०० कोटींचे व्यावहार झाल्याचेही तापासात स्पष्ट झाले. याचबरोबर त्याने ८०० ते ९०० गुंतवणूकदारांना गंडा घातल्याची माहिती समोर आली. या प्रकरणामुळे विशाल फटेची बार्शीचा हर्षद मेहता अशी ओळख झाली होती. हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते.

Avinash Rathod and Vishakha Rathod, Vishal Phate
अबब! विशाल फटेच्या खात्यावरून तब्बल 100 कोटी रुपयांचे व्यवहार

७०० कोटींचा घोटाळा

आता पुण्यातील राठोडने केलेले प्रकरणातही शेकडो लोकांची फसवणूक झाली आहे. दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत दोन गुन्हे दाखले झाले असले तरी आणखी लोक तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. तसेच यातील फसवणुकीची रक्कम स्पष्ट झाली नसली तरी तो आकडा सुमारे ७०० कोटी रुपयांचा असल्याची माहिती आहे. यात पुण्यासह राज्यातील लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झालेली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com