Sillod Assembly Election :  सिंचन प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना जागा दाखवा : अब्दुल सत्तार 

Sillod Assembly Election :  भराडी सिंचन प्रकल्पामुळे पूर्णा नदीत एकूण 42 किलोमीटर अंतरावर पाणी अडणार
Abdul Sattar, Shiv Sena candidate
Abdul Sattar, Shiv Sena candidateSarkarnama
Published on
Updated on

Sillod Assembly Election : शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या भराडी सिंचन प्रकल्पास विरोधकांनी या प्रकल्पाची गरज नसल्याची लेखी तक्रार शासनाकडे केली. त्यामुळेच भराडी सिंचन प्रकल्पाला उशीर झाला.

जर त्यांनी तक्रार केली नसती तर आज पूर्णेचे पाणी प्रत्येकाच्या अंगणी आले असते, असा दावा महायुतीचे शिवसेना उमेदवार अब्दुल सत्तार यांनी भराडी (ता. सिल्लोड) येथील प्रचार सभेत केला. महायुतीचे शिवसेना उमेदवार सत्तार यांनी भराडी येथे नागरिकांशी संवाद साधला.

Abdul Sattar, Shiv Sena candidate
Subhash Deshmukh: दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी भाजपला साथ द्या

शेतकरी सक्षम व्हावा, असे विरोधकांना वाटत नाही म्हणून ते कोणत्याही जनहितार्थ योजनेत खोडा घालतात. या निवडणुकीत आशा लोकांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, यासाठी कृषी विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

भराडी सिंचन प्रकल्प याचाच एक भाग आहे. भराडी सिंचन प्रकल्पास पहिल्या टप्प्यात 541 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जवळपास पंधराशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

या प्रकल्पामुळे पूर्णा नदीत एकूण 42 किलोमीटर अंतरावर पाणी अडणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बारामाही बागायतदार होणार असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले.

Abdul Sattar, Shiv Sena candidate
Subhash Deshmukh: दहा वर्षांत दक्षिणसाठी काँग्रेसपेक्षा जास्त निधी आणला

यावेळी श्रीराम महाजन, बाजार समितीचे संचालक श्रीरंग पाटील साळवे, रमेश पाटील साळवे, अनिस पठाण, भाजपा व्यापारी आघाडी सेलचे मराठवाडा प्रमुख विनोद मंडलेचा, संजय डमाळे, पांडुरंग दुधे, गोविंदराव भोजने, पंढरीनाथ ताठे, गजानन महाजन, गणेश ढोरमारे, पप्पू जगनाडे, प्रवीण मिरकर, दत्ता कुडके यांची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com